सहकार क्षेत्राने नवीन बदल अंगीकारावेत : माजी मंत्री शिवरकर

Co-operative sector should adopt new changes says Former minister Shivarkar
Co-operative sector should adopt new changes says Former minister Shivarkar

मांजरी : सभासदांचे हीत आणि आधुनिक व्यवहार प्रणालीचा अधिकाधिक वापर यामुळे सन्मित्र सहकारी बँकेने फिनिक्स पक्षा प्रमाणे प्रगती साधली आहे. सहकार यशस्वीपणे टिकून राहण्यासाठी या क्षेत्राने आता नवीन बदल वेळोवेळी अंगीकारले पाहिजेत, असे मत माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी व्यक्त केले.

सन्मित्र सहकारी बँकेची 46 वी वार्षिक सर्वसाधारण सभा हडपसर येथील नेताजी सुभाष मंगल कार्यालयात पार पडली. त्यावेळी उपस्थित सभासदांना मार्गदर्शन करताना माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर बोलत होते. बँकेचे अध्यक्ष सुनिल गायकवाड अध्यक्षस्थानी होते. 

माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, माजी नगरसेविका काविता शिवरकर, बाळसाहेब कोद्रे, अॅड. प्रभाकर शेवाळे, बँकेचे उपाध्यक्ष भरतलाल धर्मावत, संचालक चंद्रकांत ससाणे, यशवंत साळुंखे, दामोदर गाढवे, सुदाम जांभुळकर, संजय शेवाळे, जयसिंग गोंधळे, रमेश काकडे, गणेश फुलारे, लक्ष्मण कोद्रे, प्रशांत तुपे, दिलीप टकले, संभाजी हाके, रेश्मा हिंगणे, शुभांगी कोद्रे तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास आदमाने व सभासद यावेळी उपस्थित होते.

शिवरकर म्हणाले, 'सन्मित्र सहकारी बँक ही सभासदांची हित जपणारी बँक आहे. केवळ व्यवसाय करणे, नफा कमविणे इतकाच बँकेचा उद्देश नसून सामाजिक बांधिलकी राखण्याचे कामही सन्मित्र बँक करीत आहे. सहकार क्षेत्रात वाढती स्पर्धा त्याचप्रमाणे रिझर्व्ह बँक, सहकार खाते यांचे कडक धोरण या सर्व आव्हानांना यशस्वीरीत्या सामोरे जाण्याचे काम बँक करीत आहे. बँकेच्या प्रगतीमध्ये सभासदांचे योगदानही मोलाचे असून संचालक व सेवक यांचे काम कौतुकास्पद आहे.'

बँकेचे अध्यक्ष गायकवाड म्हणाले, 'बँकेने अर्थव्यवस्था आणि समाजव्यवस्था यांची अनोखी सांगड घालून, सुशासन राबविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे नवीन वैशिष्ट्यपूर्ण अर्थसंस्था निर्माण होऊन सामान्यांना मदतीचा हात देणारी बँक असा नावलौकिक बँकेने निर्माण केला आहे.'

केरळ राज्यातील आपतग्रस्तांच्या मदतीकरिता बँकेच्यावतीने रु. 51 हजारची देणगी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’ला देण्यात आली आहे. बँकेने ‘अ’ दर्जा ऑडिट वर्ग मिळविला असून सभासदांकरिता दहा टक्के लाभांश जाहीर केला आहे. उपाध्यक्ष भरतलाल धर्मावत यांनी आभार मानले. तर गणेश फुलारे यांनी सुत्रसंचलन  केले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com