esakal | बारामतीकरांचे एक पाऊल पुढे, शेजारच्या तालुक्यांतही या संस्थेचा विस्तार
sakal

बोलून बातमी शोधा

nira

बारामती येथील बारामती तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या पुरंदर तालुक्यातील नीरा येथील 21 व्या शाखेचे उद्घाटन आज झाले. 

बारामतीकरांचे एक पाऊल पुढे, शेजारच्या तालुक्यांतही या संस्थेचा विस्तार

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती (पुणे) : बारामती येथील बारामती तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या पुरंदर तालुक्यातील नीरा येथील 21 व्या शाखेचे उद्घाटन आज झाले. 

कोरोना काळात आरोग्य विभागाचे कार्यालयच बंद..कारण..

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, दूध संघाचे अध्यक्ष संदीप जगताप, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष शिवाजीराव टेंगले, उपाध्यक्ष भाऊसाहेब भिसे, संचालक बाबासाहेब भोसले, संपतराव जगताप, भगवानराव क्षीरसागर, संघाचे व्यवस्थापक नीलेश लोणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बारामती तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या नीरा येथील शाखेचे उद्घाटन आज झाले. 

पुण्यात 34 दिवसांत बाधितांची संख्या चौपट

दरम्यान, बारामती तालुक्याबाहेरची खरेदी विक्री संघाची ही पहिलीच शाखा असून, पुरंदर तालुक्यातील लोकांना या शाखेचा उपयोग होईल, अशी अपेक्षा शिवाजीराव टेंगले यांनी या प्रसंगी नमूद केले. दरम्यान, येत्या शुक्रवारी (ता. 24) इंदापूर तालुक्यातील भिगवण येथेही खरेदी विक्री संघाची शाखा सुरु करीत असल्याचेही टेंगले यांनी नमुद केले. 

बारामती तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या वतीने बी बीयाणे, खते, शेती औषधांच्या 20 शाखा, तर औषध दुकानाच्या चार शाखा असून, पेट्रोल व सीएनजी पंप चालविला जात आहे. संघाची वार्षिक उलाढाल 100 कोटी रुपये आहे.