सीओईपीला एकल तंत्रज्ञान विद्यापीठाचा दर्जा बहाल

महाराष्ट्र सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ अधिनियम २०२२ गुरूवारी प्रसिद्ध
COEP
COEPSakal

पुणे - शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे अर्थात सीओईपी म्हणून जगभरात नावाजलेल्या महाविद्यालयाला आता एकल तंत्रज्ञान विद्यापीठाचा दर्जा बहाल झाला आहे. राज्य शासनाने गुरूवारी (ता. २३) यासंबंधीचा अधिनियम जारी केला आहे. मार्च महिन्यात राज्याच्या विधान मंडळात या संबंधीचा मसुदा पारीत करण्यात आला होता.

राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयाने फेब्रुवारी २०२० च्या सुमाराला एकल तंत्रज्ञान विद्यापीठाची घटना तयार करण्यासाठी शिक्षण तज्ज्ञांची समिती गठीत केली होती. समितीचे नेतृत्व खरगपूर येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेचे माजी संचालक प्रा. संजय धांडे यांच्याकडे होते. फेब्रुवारी २०२२ मध्ये राज्य शासनाने अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे या संस्थेला तंत्रज्ञान विद्यापीठ हा दर्जा देण्याबाबतचा संविधानिक मसुदा सादर केला. नुकतेच २५ मार्च २०२२ रोजी विधान मंडळाच्या दोन्ही सभागृहांनी मंजुरी मिळून सदरचे बिल राज्यपालांच्या स्वाक्षरीसाठी सादर करण्यात आले आणि ११ मे २०२२ रोजी त्याचे कायद्यात रुपांतर झाले.

सीओईपीच्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की,''सीओईपीला २००३-०४ या शैक्षणिक वर्षातच महाराष्ट्र शासनाने प्रशासकीय, आर्थिक आणि व्यवस्थापनाच्या संदर्भात स्वायत्तता बहाल केली होती. त्यानंतर संगणक तज्ज्ञ डॉ. फकिरचंद कोहली यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली संस्थेच्या नियामक मंडळाची मुहूर्तमेढ करण्यात आली. आज संस्थेची धुरा नियामक मंडळाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या हातात आहे.

राष्ट्रीय पातळीवरील विविध नामांकने आणि त्यातील अत्युत्कृष्ट दर्जा प्राप्त करण्यासाठी आवश्यक ती सर्व धोरणे आखणे आणि त्याचा सातत्यपूर्ण पाठपुरावा करणे त्यांच्या अनुभवी नेतृत्वामुळेच शक्य झाले आहे. ही उंची गाठण्यासाठी आणि सर्व बदलांना आत्मसात करताना सर्वंकष उन्नतीचे ध्येय समोर ठेऊन येथील प्राध्यापक, कर्मचारी आणि प्रामुख्याने गुणवंत विद्यार्थी तसेच प्रख्यात माजी विद्यार्थी आणि औद्योगिक व्यवस्था यांचा भक्कम पाठींबा देखील महत्वाचा ठरला आहे."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com