कडाका वाढणार; नगर 7 अंशांवर!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 नोव्हेंबर 2016

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील किमान तापमान घटले
पुणे - राज्यात थंडीचा कडाका वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्‍यता आहे. तसेच उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव वाढत असल्याने किमान तापमानाचा पार अजून खाली उतरेल, असेही खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्यात सर्वांत कमी किमान तापमान नगर येथे 7.1 अंश सेल्सिअस नोंदले गेले. पुण्यात किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा 3.7 अंशांनी कमी होऊन 9.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुण्यात पुढील चार-पाच दिवसांमध्ये थंडी वाढण्याची शक्‍यता आहे. शहर आणि परिसरातील आकाश बुधवारी (ता. 23) अंशतः ढगाळ रहाणार असल्याने किमान तापमानाचा पारा 11 अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. पण त्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून (ता. 24) लगेचच आकाश निरभ्र राहणार आहे. त्यामुळे किमान तापमानाचा पारा 9 अंश सेल्सिअसपर्यंत उतरेल, असेही हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले.

राज्यात थंडी लाट पसरत आहे. पुणे, नगर आणि नाशिक येथील तापमानाचा पारा दहा अंश सेल्सिअसपेक्षा खाली गेला आहे. राज्यातील उर्वरित शहरांमधील तापमानाचा पाराही सरासरीपेक्षा कमी झाला आहे.

मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली. कोकण, गोव्याच्या काही भागांत व विदर्भाच्या उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली, तर विदर्भाच्या काही भागांत किमान तापमान सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते.

नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरात श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळ कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्‍यता आहे. येत्या शनिवारपर्यंत (ता. 26) राज्यात गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्‍यता आहे.

Web Title: cold increase