शहरात कडाक्‍याच्या थंडीची अद्यापही प्रतीक्षा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 डिसेंबर 2016

पुणे - डिसेंबरचा पहिला आठवडा संपल्यानंतरही शहरात अद्यापही कडाक्‍याच्या थंडीची प्रतीक्षा आहे. मंगळवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत किमान तापमानाचा पारा 14.4 अंश सेल्सिअस नोंदला गेला होता. हा पारा पुढील दोन दिवसांमध्ये 10 अंश सेल्सिअसपर्यंत उतरण्याची शक्‍यता वेधशाळेने वर्तविली आहे.

बंगालच्या उपसागरात अंदमान आणि निकोबार बेटांच्या परिसरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे पुण्यासह राज्याच्या काही भागात ढगाळ वातावरण झाले आहे. त्यामुळे डिसेंबरमध्ये असणारी कडाक्‍याची थंडी आता जाणवत नसल्याचे निरीक्षण हवामान खात्यातील तज्ज्ञांनी नोंदविले आहे. शहरात किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा दोन अंश सेल्सिअसने वाढला आहे. किमान तापमान पुढील दोन दिवसांमध्ये कमी होईल; पण त्यातूनही थंडी परत येईल, अशी स्थिती नसल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले.

Web Title: cold pune