थंडीच्या दिवसांत व्यायाम कराच! (व्हिडिओ)

Exercise
Exercise

गोखलेनगर - थंडीचे दिवस सुरू झाले आहेत, शिवाजीनगरमधील अनेक उद्याने, पोलिस मैदाने, फर्ग्युसन महाविद्यालयाचे गोखलेनगर येथील मैदान, वेताळ टेकडी अशा अनेक ठिकाणी पहाटेच्या रम्य वातावरणात नागरिक व्यायामासाठी जातात. शारीरिक कष्टांची कामे बंद झाल्याने व ऑफिसध्ये दिवसभर बैठे काम असल्याने पोटाची चरबी वाढणे, आळस वाढणे यांवर उपाय म्हणून थंडीच्या दिवसांतील व्यायाम शरीरास लाभदायक ठरतो. शरीरयष्टी चांगली दिसावी, शरीर निरोगी व आरोग्यसंपन्न राहण्यासाठी तरुणांनी नियमित व्यायाम करण्याचे आवाहन ज्येष्ठांकडून होत आहे.

संभाजी उद्यानात पुणे महापालिकेच्या माध्यमातून ओपन जिमचे साहित्य बसवल्याने येथे स्ट्रेचिंग, योगासने, प्राणायाम, चालणे व इतर व्यायामांसाठी नागरिकांची संख्या वाढली आहे. अनेक वर्षांपासून संभाजी उद्यानात नियमित व्यायाम करणारे नागरिक व्यायाम व आरोग्यविषयीचे महत्त्व तरुणांना सांगत असतात.

नागरिकांच्या प्रतिक्रिया
किरण साताळकर - ८ वर्षांपासून आम्ही दोघे पती-पत्नी दररोज संभाजी उद्यानात व्यायामासाठी येतो. दररोज ४५ मिनिटे चालल्याने शरीर निरोगी व तंदुरुस्त राहते. तरुणांनी दररोज व्यायाम केला पाहिजे. गवतावर अनवानी पायाने चालल्याने डोळ्यांचे आरोग्या सुधारते.

रमेश ढुमरे - मी नियमित संभाजी उद्यानात योगासने करतो. गाड्यांची सर्व्हिसिंगप्रमाणे आपल्या शरीराचेही सर्व्हिसिंग होणे महत्त्वाचे आहे. नियमित व्यायामामुळेच माझे वय ७४ असूनही ते कमी दिसते. थंडीच्या दिवसांत घाम शरीराबाहेर कमी पडतो. त्यामुळे कॅलरीज बर्न होत नसल्याने थंडीत व्यायाम आवश्‍यक आहे. तरुणांनी दररोज १ तास व्यायाम 
केला पाहिजे.

बाळकृष्ण पवार - मी दररोज योगासने व प्राणायाममुळे दिवसभर उत्साही राहतो. तरुणांनी नियमित व्यायाम करावा, ज्यामुळे शरीर सदैव तंदुरुस्त राहील.

रमेश कात्रे (योगशिक्षक भारतीय योगसंस्थान केंद्रप्रमुख) - योगासनांमुळे शरीर तंदुरुस्त राहते, मानसिक ताण कमी होतो, व्यायामाकरिता पहाटे लवकर उठण्याची सवय लागते.     

रजनी कात्रे - बाल, तरुण व ज्येष्ठ असे कोणीही आसने करू शकतो, ज्यामुळे कंबरदुखी, पाटदुखी बरी होते. पचनक्रिया चांगली राहते, झोप चांगली लागते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com