Pune News : पुण्यात थंडीचा कडाका वाढणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Winter
पुण्यात थंडीचा कडाका वाढणार

पश्चिम महाराष्ट्रासह पुण्यात थंडीचा कडाका वाढणार

पुणे : पुणे शहर आणि परिसरातील किमान तापमानात येत्या रविवारपासून (ता. २३) घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुण्यात थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यासोबतच कोल्हापूर, सोलापूर आणि सातारा-सांगलीतील तापमानात पुन्हा घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या दोन दिवसात पुणे शहरात किमान तापमान १० अंशाच्या खाली जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: Uttarakhand Election : रावत यांची काँग्रेसमध्ये वापसी

शहरात गेल्या तीन दिवसांपासून कमाल तापमान ३० अंशांच्या वर नोंदले जात आहे, तसेच किमान तापमानात चढ-उतार कायम आहे. त्यामुळे दिवसा उनाचे चटके बसून लागले आहेत, तर मागील दोन दिवसांपासून शहरातील अंशतः ढगाळ वातावरणदेखील कायम आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (ता. २२) शहर आणि परिसरात आकाश अंशतः ढगाळ राहणार असून, त्यानंतर मुख्यतः निरभ्र वातावरणाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे किमान तापमानाचा पारादेखील घसरणार असून, शहर आणि परिसरात किमान तापमान हे ९ ते १२ अंशाच्या दरम्यान नोंदले जाऊ शकते. शहरात शुक्रवारी ३१.८ अंश सेल्सिअस कमाल, तर ११.१ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले. राज्यातील बऱ्याच ठिकाणी कमाल तापमान ३० अंशांच्यावर नोंदले जात आहे. सध्या पश्‍चिमी चक्रावात आणि अरबी समुद्रावरून येणाऱ्या बाष्प पुरवठ्यामुळे राज्यातील काही भागांत पावसासाठी पोषक हवामान होत आहे. यामुळे पुढील दोन दिवसांत उत्तर कोकण व उत्तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात ढगाळ हवामान व हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

हेही वाचा: आरोग्य मंत्रालयाकडून १८ वर्षांच्या आतील मुलांसाठी दिशानिर्देश जारी

नीचांकी तापमान गोंदियात

राज्यात शुक्रवारी सर्वाधिक कमाल तापमान सांगली येथे ३४.६ अंश सेल्सिअस, तर नीचांकी तापमान गोंदिया येथे १०.८ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. दरम्यान, पश्चिमी चक्रावाताच्या प्रभावामुळे उत्तरेकडील राज्यांमध्ये विजांसह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. उत्तर अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे राज्यातील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मात्र, सोमवारपासून (ता. २४) राज्यातील किमान तापमानात २ ते ४ अंश सेल्सियसने घट होण्याची शक्यता आहे.

Web Title: Cold Snap Will Increase Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..