थंडीचा कडाका वाढणार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 जानेवारी 2017

पुणे - पुण्यातील थंडीचा पारा चोवीस तासांमध्ये 1.9 अंश सेल्सिअसने वाढून रविवारी 9.7 अंश सेल्सिअस नोंदला गेला. पुढील एका दिवसात किमान तापमान किंचित वाढणार असून, त्यानंतर पुन्हा थंडीचा कडाका वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला. राज्यात सर्वांत कमी किमान तापमान सातारा येथे 7.5 अंश सेल्सिअस नोंदले गेले. 

उत्तर भारतात थंडीची लाट आहे. तेथून गार वारे महाराष्ट्राच्या दिशेने वाहत असल्याने गेल्या दोन दिवसांमध्ये किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा चार ते पाच अंश सेल्सिअसने कमी झाला होता. त्याच वेळी उत्तर महाराष्ट्रात कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव वाढल्याने किमान तापमान रविवारी दोन अंश सेल्सिअसने वाढले; पण सरासरीपेक्षा अद्यापही किमान तापमानाचा पारा कमी आहे. पुढील दोन दिवसांमध्ये याचा प्रभाव कमी होणार असल्याने पुन्हा शहर आणि परिसरात थंडीचा कडाका जाणवेल, असेही हवामान खात्यातील अधिकाऱ्यांनी सांगितले. 

मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही भागांत किमान तापमानाच्या पाऱ्यात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली. राज्यात आकाश मुख्यतः कोरडे आणि निरभ्र राहणार असल्याने पुढील काही दिवसांमध्ये थंडीचा कडाका वाढेल, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Web Title: cold weather