वही पेन संकलनाने बाबासाहेबांना अभिवादन

रमेश मोरे
बुधवार, 11 एप्रिल 2018

जुनी सांगवी- डॉ.बाबासाहेब आंबेडकर वही पेन संकलन व वितरण समितीच्या वतीने जुनी सांगवी येथील अरविंद ऐज्युकेशन सोसायटीच्या वतीने पाचशे वही व पेनचे संकलन करण्यात आले. १४ एप्रिल डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनासाठी मेणबत्ती पुष्पहार, फुले न आणता एक वही व एक पेन देवुन अभिवादन करावे असा उपक्रम गेली दोन वर्षापासुन पिंपरी चिंचवड शहर वही पेन संकलन व वितरण समितीच्या वतीने सुरू करण्यात आला आहे. 

संकलित झालेले वही पेन समितीचे कार्यकर्ते महाराष्ट्रातील ग्रामीण भागात जावुन गरजु विद्यार्थ्यांना वाटप करतात. येथील अरविंद ऐज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थ्यांनी संकलित केलेले पाचशे वही व पेन संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, माजी नगरसेवक अतुल शितोळे यांच्या हस्ते समितीकडे सुपुर्द करण्यात आले. यावेळी आरती राव म्हणाल्या, मेणबत्ती पुष्पहारांऐवेजी एक वही व एक पेन गरजु विद्यार्थ्यांच्या हाती देणे, हेच खरे बाबासाहेबांना त्यांच्या जयंतीदिनी अभिवादन ठरेल. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय कांबळे यांनी केले. कार्यक्रमास वही पेन संकलन व वितरण समितीचे प्रमोद गायकवाड, रामदास ईंगळे, राहुल गायकवाड आदी उपस्थित होते.

Web Title: collecting notebook & pen celebrated babasaheb ambedkar birth anniversary