वेल्हे येथील दाै-यात जिल्हाधिकारी देशमुख म्हणतात...

मनोज कुंभार
Thursday, 10 September 2020

बुधावरी (ता. ९ रोजी) सायंकाळच्या सुमारास डॉ. राजेश देशमुख यांनी वेल्हे येथील कोवीड केअर सेंटरची पाहणी केली.

वेल्हे (पुणे) : साहेब तेवढे वेल्हेत कोविड केअर सेंटर व ग्रामीण रुग्णालयातील डेडीकेटेड कोविड सेंटरमध्ये पुरेसे डॉक्टर उपलब्ध नाहीत, साहेब याठिकाणी लॅब टेक्निशिअन नाही, वार्डबॉय व चतुर्थ कर्मचारी संख्या कमी आहे. वेल्हेतील रुग्णांना शहरात 
व इतर ठिकाणी लवकर बेड उपलब्ध होत नाहीत अशा अनेक प्रश्न तालुका प्रशासनातील अधिका-ंयानी जिल्हाधिकार्यांसमोर उपस्थित केले. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी येथील परिस्थितीची पाहणी केली.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बुधावरी (ता. ९ रोजी) सायंकाळच्या सुमारास डॉ. राजेश देशमुख यांनी वेल्हे येथील कोवीड केअर सेंटरची पाहणी केली. तसेच वेल्हे येथील ग्रामीण रुग्णालयात तयार केलेल्या डेडीकेटेड कोवीड केअर सेंटरची पाहणी करत कामाचा आढावा घेतला.

देशमुख म्हणाले, ''संपुर्ण जिल्हामध्ये आरोग्य अधिकारी ,डॉक्टर, व इतर कर्मचारी यांच्या असलेल्या रिक्त तातडीने भरल्या असून, अद्यापही मोठ्या प्रमाणात रिक्त जागांवर भरणार असून, वेल्हेतील रिक्त जागा तातडीने भरल्या जातील.''

यावेळी जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे यांनी दुर्गम भागातील नागरीकांची आरोग्याची सोय पाहता येथील ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा वाढवून उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळावा, तालुक्यातील अन्न सुरक्षा धान्य वाटपाचा कोठा वाढवुन मिळावा व इतर मागणीचे पत्र जिल्हाधिकारी यांना दिले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

यावेळी जिल्हा परिषद सदस्य दिनकर धरपाळे, भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, तहसिलदार शिवाजी शिंदे, तालुका वैद्यकीय अधिकारी अंबादास देवकर, साहय्यक पोलीस निरीक्षक विनायक देवकर, राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष शंकर भुरुक आदी उपस्थित होते.

(Edited by : Sagar Diliprao Shelar)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Collector visited Velhe and inspected the Corona