पुणे : महाविद्यालयीन निवडणूका 7 सप्टेंबरला होणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयीन विद्यार्थी परिषदेसाठी 7सप्टेंबरला मतदान होईल. 
- विद्यापीठ विद्यार्थी परिषदेसाठी 24 सप्टेंबरला मतदान होईल. 

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयीन विद्यार्थी परिषदेसाठी सात सप्टेंबरला तर विद्यापीठ विद्यार्थी परिषदेसाठी 24 सप्टेंबरला मतदान होईल. 

विद्यापीठाने या संदर्भात सविस्तर निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार महाविद्यालयातील निवडणुकांसाठी 29 ऑगस्टपासून अर्ज भरता येईल. 7 सप्टेंबरला मतदान झाल्यानंतर लगेचच मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल.

विद्यापीठ विद्यार्थी परिषदेसाठी 14 सप्टेंबरपासून अर्ज भरता येतील. या निवडणुकीचा निकाल 27 सप्टेंबरला घोषित केला जाईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: College elections to be held on 7 September in pune