पुण्यात विद्यालयाच्या कर्मचाऱ्यास मुलांकडून बेदम मारहाण

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 मे 2018

पुणे  : येरवडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या मैदानातून महाविद्यालयीन कर्मचाऱ्याची दुचाकी ओढून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुलांना कर्मचाऱ्याने हटकले. त्याचा राग आल्याने मुलांनी कर्मचाऱ्यावर चाकूने वार करून बेदम मारहाण केली. ही घटना गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. दरम्यान, पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून, 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

सिद्धार्थ बनसोडे (वय 21, रा. धानोरी) असे जखमी कर्मचाऱ्याचे नाव असून, त्यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

सुटी असल्याने अनेक मुले महाविद्यालयाच्या मैदानात खेळण्यास येतात. बनसोडे हे सायंकाळी सहाच्या सुमारास घरी जाण्यासाठी निघाले होते. त्या वेळी मैदानाजवळ लावेलली त्यांची दुचाकी दोन मुले ओढून नेत असल्याबद्दल त्यांनी विचारणा केली. त्या वेळी संबंधित मुलांनी त्यांच्याशी वाद घालण्यास सुरवात केली. या दोन मुलांसह इतर 15 जणांनी लोखंडी गज, बॅट व स्टम्पने त्यांना मारहाण केली तर एकाने त्याच्याजवळील चाकूने बनसोडे यांच्यावर वार केले. 

दरम्यान, शिक्षक असवले व शिपाई दिलीप कडके यांनी ही भांडणे सोडविण्याचा प्रयत्न केल्यानंतर मुलांनी त्यांनाही मारहाण केली. या घटनेत बनसोडे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सहायक पोलिस निरीक्षक सूर्यकांत मारोडे तपास करत आहेत. 

पालकांची येरवड्यात दहशत 
बनसोडे यांच्यावर वार करणाऱ्या एका अल्पवयीन मुलावर यापूर्वीच बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. संबंधित मुलांच्या पालकांची येरवडा परिसरात मोठ्या प्रमाणात दहशत आहे. त्यांच्याविरुद्ध आवाज उठविल्यास संबंधित परिवाराचा छळ केला जातो. इतकी दहशत असूनही पोलिस मात्र त्यांच्यावर कारवाई करत नसल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला.

Web Title: College employee beaten by youth in Pune