पुण्यात 'या' महाविद्यालयांचे हाॅस्टेल झाले 'क्वारंटाईन सेंटर'

College hostel become quarantine centres in pune
College hostel become quarantine centres in pune

पुणे : 'पुण्यात रोज कोरोनाचे हजारपेक्षा जास्त रुग्ण आढळत असताना त्यांना क्वारंटाईन करण्यासाठी रुग्णालयात जागा शिल्लक नाही, घरात व्यवस्था नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आता महाविद्यालयांची वसतीगृह 'कोवीड केअर सेंटर' (सीसीसी') म्हणून कार्यान्वित केली जात आहेत. यामध्ये ५ हजार पेक्षा जास्त जणांची व्यवस्था होणार आहे.

'अभ्यासक्रम कमी केला, तशी 'फी' पण कमी करा'; शिक्षणमंत्र्यांकडे कुणी केली मागणी?

पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. महापालिकेने खासगी रुग्णालये या रुग्णांच्या उपचारासाठी सेवेत आणली, पण तेथेही जागा शिल्लक नाही. सौम्य, मध्यम लक्षणे असणारे रुग्ण जास्त असल्याने त्यांनी रुग्णालयांमधील बेड व्यापले आहेत. त्यामुळे गंभीर रुग्णांना बेड मिळत नाही अशी अवस्था आहे. यासाठी महापालिकेने रुग्णांना घरीच क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेतला, पण बहुंताश रुग्णांना घरी व्यवस्था करणे शक्य नाही. त्यासाठी आता महाविद्यालयांच्या वसतीगृहात व्यवस्था केली जात आहे. काही ठिकाणी पूर्ण व्यवस्था महापालिकेने केली आहे. तर काही ठिकाणी स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून व्यवस्था केली जात आहे. 

एक दोन नव्हे, तर तब्बल २२ भाषा बोलते 'ही' मराठी तरुणी!​

सध्या सीओईपी, फर्ग्युसन महाविद्यालयात, आबासाहेब गरवारे महाविद्यालय येथील हाॅस्टेल, एसएनडीटी, संत ज्ञानेश्वर हाॅस्टेल येरवडा, ट्रिनीटी महाविद्यालय हाॅस्टेल यासह
इतर ठिकाणी रुग्णांची व्यवस्था केली आहे. तर, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत डेक्कन येथील महर्षी कर्वे शिक्षण संस्थेचे वसतीगृह आणि एसपी महाविद्यालय, वसतीगृह याठिकाणी व्यवस्था केली जाणार आहे.

"राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समर्थ भारत अभियानाअंतर्गत विविध सेवा प्रकल्प सुरू आहेत, त्यापैकी एक क्वारंटाईन सेंटरमध्ये रुग्णसेवा केली जात आहे. सध्या गरवारे महाविद्यालयात व्यवस्था लावली आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात एसपी महाविद्यालय, डेक्कन येथील महर्षी कर्वे शिक्षण संस्थेच्या वसतीगृहात रुग्णांची व्यवस्था केली जाईल."
- सुनिल खेडेकर, प्रचार प्रमुख, पुणे महानगर​


"पुढील काळात रुग्णसंख्या वाढणार आहे, त्याचा विचार करून सुमारे १५  शिक्षण संस्था व वसतीगृहांमध्ये क्वारंटाईनची व्यवस्था करत आहोत. तेथे मदत करण्यासाठी स्वयंसेवी संस्था, गणेश मंडळांनी तयारी दाखवली आहे. ही व्यवस्था पुढील सहा महिन्यांसाठी असणार आहे."
- राजेंद्र मुठे, उपायुक्त, पुणे महापालिका

'आरटीई'ला बसला कोरोनाचा फटका; फक्त १४ टक्के प्रवेश झाले निश्चित!​

संस्था व बेडची संख्या
सीओईपी वसतीगृह - ६००
एमएमसीसी कर्वेनगर - २४०
ट्रिनीटी महाविद्यालय हाॅस्टेल - २२५
एसएनडीटी - २१२
संत ज्ञानेश्वर हाॅस्टेल येरवडा - ३६०
आबासाहेब गरवारे महाविद्यालय - ३००
फर्ग्युसन महाविद्यालय - ३००
शेतकी महाविद्यालयात, शिवाजीनगर - ८००
कमिन्स काॅलेज, वारजे - ६००
पुणे विद्यापीठ - ३००
भारती विद्यापीठ कोथरूड - २५०
आंबेडकर हाॅस्टेल येरवडा - २४०
एमआयटी कोथरूड - ३५०
सिंबायोसिस हाॅस्टेल विमाननगर - ४००
जेएसपीएम  हडपसर - ४००

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com