पुणे : सीओईपीचे ‘एकात्मक सार्वजनीक विद्यापीठ’ विधेयक मंजूर

अधिवेशनामध्ये मंजूर झालेल्या विधेयकावर राज्यपालांनी स्वाक्षरी केल्यानंतर त्याचे कायद्यात रूपांतर होणार
College Of Engineering Pune Unitary University Bill passed in both sabha  pune
College Of Engineering Pune Unitary University Bill passed in both sabha pune sakal

पुणे : अभियांत्रिकी महाविद्यालय पुणेला (सीओईपी) एकात्मक सार्वजनिक विद्यापीठ (युनिटरी युनव्हर्सिटी) म्हणून मान्यता देणारा मसुदा आता विधेयकात रूपांतरित झाला आहे. राज्याच्या विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात यासंबंधीच्या विधेयकाला मंजुरी मिळाली आहे. अतिशय जलद गतीने एका स्वायत्त महाविद्यालयाला एकात्मक सार्वजनिक विद्यापीठ म्हणून मान्यता मिळण्याची ही पहिलीच वेळ असावी.

अधिवेशनामध्ये मंजूर झालेल्या विधेयकावर राज्यपालांनी स्वाक्षरी केल्यानंतर त्याचे कायद्यात रूपांतर होणार आहे. सीओईपीच्या नियामक मंडळाच्या वतीने यासंबंधीचा पाठपुरावा करण्यात येत होता. सीओईपीचे संचालक डॉ. बी.बी.अहुजा म्हणाले,‘‘एकात्मक सार्वजनिक विद्यापीठ म्हणून आम्हाला मान्यता मिळावी म्हणून आम्ही आग्रही होतो. त्यासंबंधी उच्च व तंत्रशिक्षण विभागही सकारात्मक होता. सर्वांच्या प्रयत्नाने महिनाभरात विधानसभेत मान्यता मिळाली आहे. संस्थेच्या आजवरच्या इतिहासातील हा महत्त्वपुर्ण टप्पा आहे.’’ सीओईपीला आता नवीन शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रम, मुल्यमापनाची रचना करता येणार आहे. तसेच प्रमाणपत्र, पदवी, पदव्युत्तर आणि पीएचडीच्या नव्या अभ्यासक्रमांबरोबरच ड्युअल डिग्री अभ्यासक्रमांनाही चालना मिळेल.

अधिक स्वायत्तता मिळाल्याने सीओईपीला उद्योगाभिमुख अभ्यासक्रमांना प्राधान्य देता येणार आहे. सीओईपीचा नावलौकीक पाहता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शरद पवार, पुण्याचे पालकमंत्री अजीत पवार, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विशेष पुढाकार घेतला होता. एकात्मक सार्वजनिक विद्यापीठापर्यंतचा म्हणून सीओईपीच्या प्रवासाबद्दल बोलताना नियमाक मंडळाचे अध्यक्ष प्रताप पवार म्हणाले,‘‘इंटरनेट आणि कृत्रीमबुद्धीमत्तेमुळे अभियांत्रिकीमध्ये अनेक वैशिष्ट्यपुर्ण बदल होत असून, उद्योगांसह सर्व क्षेत्रात देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी हा बदल टिपणाऱ्या अभियंत्यांची गरज आहे. नवीन शैक्षणिक धोरणातही या गोष्टींचा अंतर्भाव केला आहे. मात्र सीओईपीसारख्या वैशिष्ट्यपुर्ण आणि एक प्रगल्भ परिसंस्था असलेल्या संस्थेसाठी अशा विद्यापीठाच्या दर्जाची आवश्यकता होती. यासाठी सीओईपीच्या नियामक मंडळाने तयार केलेल्या प्रस्तावाच्या मंजुरीसाठी कार्य करणाऱ्या मंत्रीमंडळासह यात प्रक्रियेत सहभागी सर्वांची संस्था आभारी आहे.’’ अतीशय विक्रमी वेळेत विधीमंडळात हा मसुदा मंजूर होण्याची ही दुर्मिळ घटना आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com