कॉलेजमध्ये खासगी क्लास

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 एप्रिल 2018

जुन्नर  - येथील श्री शिवछत्रपती कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांची खासगी शिकवणी घेतली जात असून, दाखल झालेल्या विद्यार्थ्यांकडून शुल्क रूपाने मोठी रक्कम वसूल करण्यात आली असल्याची बाब समोर आली आहे.  
‘शिक्षकांचाच क्‍लासचा धंदा’ या शीर्षकाची बातमी ‘सकाळ’च्या २८ मार्चच्या अंकात प्रसिद्ध झाली होती. त्यानुसार शिक्षण आयुक्तांकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यात जुन्नरचा उल्लेख असल्याने गटशिक्षणाधिकारी के. डी. भुजबळ यांनी बुधवारी (ता. २५) आपल्या तीन सहकाऱ्यांसमवेत महाविद्यालयात जाऊन अचानक तपासणी केली. त्या वेळी ही बाब उघड झाली आहे.

या भेटीत दहावी परीक्षा दिलेले व महाविद्यालयाशी काहीही संबंध नसलेल्यांचे शुल्क अकरावी प्रवेशावेळी घेणार असल्याचे सांगण्यात आले. अकरावी उत्तीर्ण होऊन बारावीमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी पाच हजार रुपये घेतले आहेत; तर बारावी परीक्षा दिलेल्याचे मोशन ॲकॅडमी कोटा राजस्थान व महाविद्यालयाचे शुल्क अकरावीत असताना ८० हजार रुपये आणि बारावीत असताना ८० हजार रुपये, असे एकूण एक लाख ६० हजार रुपये मुलांकडून वसूल केले असल्याचे निष्पन्न झाले आहे. यासाठी महाविद्यालयात एक स्वतंत्र तुकडी राखून ठेवल्याचेही निदर्शनास आले आहे. या सर्व बाबी महाविद्यालय आवारात बेकायदेशीरपणे सुरू केल्या आहेत. शासनमान्य आणि अनुदानित महाविद्यालयात चालणारा हा प्रकार गंभीर स्वरूपाचा असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. 

या भेटीवेळी उपप्राचार्य संजय सूर्यवंशी, पर्यवेक्षक संभाजी गायकवाड, प्रा. प्रतिभा लोढा, चंद्रकांत कांबळे, ‘मोशन’चे समन्वयक अभिषेक पंजावणी, प्रा. नरेंद्र चौधरी, रालाभ विजय, सुधीरकुमार, प्रवीणकुमार जैन हे उपस्थित होते. ‘मोशन’च्या प्राध्यापकांनी जबाब न देता पलायन केले. तसेच याबाबत माहितीच्या अधिकारात विचारलेल्या पत्रास उत्तर देताना, महाविद्यालयात कोणत्याही प्रकारचे खासगी क्‍लास चालत नसल्याचे १३ एप्रिलच्या लेखी उत्तरात नमूद केले आहे. त्यामुळे संबंधितांनी चुकीचे उत्तर दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

अन्य एका महाविद्यालयातही प्रकार
जुन्नर तालुक्‍यातील अन्य एका महाविद्यालयात असा प्रकार होत असल्याची चर्चा आहे. याबाबतचा गोपनीय अहवाल शिक्षण विभागास पाठविण्यात आला आहे. तसेच, गुरुवारी झालेल्या पंचायत समितीच्या सभेत गटशिक्षणाधिकारी भुजबळ यांनी ही माहिती दिल्यानंतर सभागृहाने पुढील कार्यवाही करण्यास पाठिंबा असल्याचे सांगितले आहे.

Web Title: college private class