महाविद्यालयीन विद्यार्थ्यानी सोशल मिडियाचा सकारात्म वापर करावा - रमेश खुणे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 डिसेंबर 2018

ओतूर - महाविद्यालय विद्यार्थ्यानी सोशल मिडियाचा सकारात्म वापर करावा तसेच महाविद्यालयात रॅगिंग करणार्याना पोलीसी कारवाईला सामोरे जावे लागेल, महाविद्यालयातील विद्यार्थ्यानी रॅगिंग पासुन दुर राहुन आपल्या उद्दीष्टावर लक्ष केंद्रीत करावे असे आवाहन ओतूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक रमेश खुणे यानी केले. ओतूर ता.जुन्नर येथिल अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयात विद्यार्थी विकास मंडळांतर्गत आयोजित निर्भया कन्या अभियान कार्यक्रमात खुणे मार्गदर्शन करत होते.
 सदर कार्यक्रमांमध्ये सायबर सेक्युरिटी, रॅगिंग व त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय यावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.

त्या अनुषंगाने महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांनी रॅंगिंग बाबत काय काळजी घ्यावी रॅगिंग झाल्यानंतर काय उपाययोजना तसेच प्रतिबंधात्मक उपाय काय करावे याबाबतची माहिती देण्यात आली.

तसेच यावेळी सायबर सेक्युरिटीच्या संदर्भाने विद्यार्थ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे तसेच फेसबुकचा वापर, व्हाट्सअपचा वापर ई-मेलची हाताळणी इंस्टाग्राम, बँकिंग एप्लीकेशन, इंटरनेट बँकिंग याबाबत मार्गदर्शन करण्यात आले विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा वापर कशाप्रकारे उपयोग करावा याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले तसेच त्याचे फायदे आणि तोटे याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले तसेच महिला सुरक्षा, विद्यार्थी सुरक्षा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. पोलीस स्टेशनकडील स्थापन करण्यात आलेले निर्भया पथक याबाबतची माहिती देण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांनी वाहन चालवताना काय काय काळजी घेतली पाहिजे तसेच कोण कोणती कागदपत्रे जवळ असणे गरजेचे आहे, हेल्मेटचा वापर करणे, वाहन परवाना जवळ बाळगणे याबाबतचे मार्गदर्शन करण्यात आले. तसेच महाविद्यालय स्तरावर विद्यार्थी सुरक्षा समिती स्थापन करून त्याद्वारे विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी प्रमुख उपस्थितीत 
ऍड. वृक्षाली वाळुंज, उपप्राचार्य डॉ. जी. एम. डुंबरे, विद्यार्थी विकास कक्ष सदस्य देवीदास तांबे, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत येम्मेवार हे व इतर होते. यावेळी सुत्रसंचलन प्रा.डॉ.एस.ए कल्हापुरे यांनी केले. तर आभार प्रा.गायत्री अंभोरे यानी मानले.

Web Title: The college students should use the positive social media - Ramesh Khune