महाविद्यालये बेरोजगार निर्मितीचे कारखाने - तावडे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 जानेवारी 2019

पुणे/गोखलेनगर - ‘‘देशाला कुशल मनुष्यबळाची आवश्‍यकता असताना आपण पारंपरिक शिक्षणव्यवस्थेत अडकून पडलो आहोत. पदवी व पदव्युत्तर या प्रस्थापित व्यवस्थेमुळे उच्च शिक्षण देणारी महाविद्यालये ही बेरोजगांराची निर्मिती करणारे कारखाने झाले आहेत. सरकारी प्रयत्नांबरोबरच नागरिकांनीही आपल्या मानसिकतेत बदल करून कौशल्य विकासाला हातभार लावला पाहिजे,’’ असे मत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्‍नॉलॉजी या संस्थेच्या नवीन इमारतीचे उद्‌घाटन रविवारी झाले. या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमात उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. धनराज माने, तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ, राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, तंत्र शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. दिलीप नंदनवार, प्राचार्या अनिता मुदलियार आदी उपस्थित होते.

‘‘एखादा पदवी नसलेला कुशल व्यक्ती हा एखाद्या इंजिनिअर किंवा डॉक्‍टरपेक्षा अधिक कमावतो. पदवी, नोकरी, छोकरी-छोकरा ही मानसिकता बदलायला हवी,’’ असेही तावडे यांनी नमूद केले; तसेच हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्‍नॉलॉजी संस्थेतील जागा वाढविण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. या वेळी तावडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तंत्रशिक्षण विभागाच्या ‘एनबीए स्टेटस’ पोर्टलचे  उद्‌घाटन तावडे यांच्या हस्ते  करण्यात आले.

राज्याचा अर्थसंकल्प हा जवळपास दोन लाख ६० हजार कोटी रुपयांचा आहे. त्यापैकी शिक्षणावर जवळपास ५७ हजार कोटी रुपये खर्च होतात. ही तरतूद नक्कीच पुरेशी नाही; परंतु यापैकी ९९ टक्के निधी हा पगार आणि इतर ठिकाणी खर्च होतो. वास्तविक, पायाभूत सुविधांवर खर्च होणे अपेक्षित आहे.
- विनोद तावडे, शिक्षणमंत्री

Web Title: Colleges Unemployed Producing factories says vinod tawde