"तक्रार देण्यासाठी प्रत्येकीने पुढे यावे' 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जानेवारी 2017

पुणे - ""फेसबुक, व्हॉट्‌सऍप, इस्टाग्राम अशा सोशल मीडियाचा गैरवापर करून मुलींना त्रास देण्याच्या घटनांचे प्रमाण वाढत असले, तरी प्रत्यक्षात पोलिसांकडे तक्रारीसाठी फक्त निम्म्याच मुली पुढाकार घेत आहेत. त्यामुळे "तक्रार देण्यासाठी प्रत्येकीने पुढे यावे, जेणेकरून अशा घटनांना आळा बसेल,'' असे आवाहन सायबर गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक राधिका फडके यांनी केले आहे. 

सायबर शाखेकडे येणाऱ्या तक्रारींमध्ये अश्‍लील बोलणे, अश्‍लील संदेश पाठविणे याचे प्रमाण तुलनेने अधिक आहे. ओळखीच्या व्यक्तीकडून दिल्या जाणाऱ्या त्रासाच्या घटनाही तुलनेने अधिक आहेत. काही वेळा अनोळखी क्रमांकावरून संदेश किंवा फोन येतो. मात्र, चौकशीदरम्यान तो क्रमांक ओळखीच्या व्यक्तीचा असल्याचे समजते. अनोळखी व्यक्तीकडून येणारे संदेश किंवा फोन याचे प्रमाण तुलनेने कमी आहे, असेही फडके यांनी नमूद केले. 

* तुमच्या भ्रमणध्वनी क्रमांकाचा असाही होतोय वापर 
आपण मोबाईलवर वेगवेगळे ऍप डाउनलोड करताना किंवा मोबाईलवरून "जी-मेल'चा वापर करताना येणारे नोटिफिकेशन न वाचता मान्य करत असतो. खरंतर यातील बहुतांश नोटिफिकेशन्स्‌मध्ये "तुमच्या फोनमधील किंवा ई-मेलवरील माहितीचा (डाटा) वापर आम्ही करू,'' असेही नोंदविलेले असते; परंतु त्याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. अशा स्वरूपात जमा होणारी माहिती विकणाऱ्या "रॅकेट'चे जाळेही अस्तित्वात आहे. या "रॅकेट'च्या माध्यमातून आपले क्रमांक, ई-मेल इतरांना मिळतात. त्यातूनच कित्येक वेळा अनोळखी व्यक्तींकडून ई-मेलवर किंवा मोबाईलवर त्रास देण्याचे प्रकार घडतात. 

* गेल्या वर्षभरात नोंदविलेल्या (अंदाजे) तक्रारी :- 
अश्‍लील संदेश : 40 
मोबाईलवरून धमक्‍या देणे : 30 
ई-मेलचा वापर करून पाठविलेले अश्‍लील संदेश : 35 
सोशल मीडियाद्वारे होणारे शोषण : 30 

* कशी कराल तक्रार? 
मोबाईल, ई-मेल किंवा सोशल मीडियाद्वारे लैंगिक शोषण किंवा अश्‍लील संदेश येत असल्यास "crimecyber.pune@nic.in' या ई-मेलवर लेखी तक्रार अर्ज करावा. या अर्जाची "सायबर सेल'तर्फे तातडीने दखल घेण्यात येते. तक्रार करणाऱ्या व्यक्तींशी संपर्क साधण्यात येतो, जबाब घेतला जातो. त्यानंतर त्रास देणारी व्यक्ती शोधण्यात येते आणि त्यावर गुन्हा दाखल होतो.

Web Title: To come forward to report every