चला, पर्यावरणासाठी धावूया ! "सकाळ',"फिटनेस फर्स्ट'तर्फे 10 जूनला "वृक्षाथॉन' स्पर्धा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 मे 2018

देशातील विविध शहरांत विविध विषयांवर आधारित "मॅरेथॉन' स्पर्धेचे आयोजन केले जाते. वृक्ष लागवड आणि संवर्धनाच्या उद्देशाने आणि त्याचप्रकारचा संदेश कृतीतून देणारा "वृक्षाथॉन' हा देशातील पहिलाच उपक्रम आहे.

पुणे : चला, पर्यावरणासाठी धावूया... उद्याच्या सावलीसाठी आज रोपटे लावूया... वृक्ष लागवड आणि संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी "सकाळ' आणि "फिटनेस फर्स्ट'तर्फे 10 जून रोजी "वृक्षाथॉन' ही मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. 
जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात (ता. 5) जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येतो. त्यानंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी वृक्षाथॉन पार पडणार आहे. 

याबाबतच्या प्रवेशिका स्वीकारण्यात येत असून, त्याची मुदत 25 मे पर्यंत आहे. ही प्रवेशिका ऑनलाइन उपलब्ध आहे. ही स्पर्धा 3, 5, 10 आणि 21 किलोमीटर अंतराची असून, 40 वर्षांखालील आणि 40 वर्षांपुढील पुरुष-महिला अशा गटात होणार आहे. प्रत्येक सहभागीला देशी जातीच्या वृक्षाचे रोपटे आणि पदक दिले जाणार आहे. पुणे जिल्हा ऍथलेटिक्‍स असोसिएशनच्या मान्यतेने ही स्पर्धा होत आहे. 

देशातील विविध शहरांत विविध विषयांवर आधारित "मॅरेथॉन' स्पर्धेचे आयोजन केले जाते. वृक्ष लागवड आणि संवर्धनाच्या उद्देशाने आणि त्याचप्रकारचा संदेश कृतीतून देणारा "वृक्षाथॉन' हा देशातील पहिलाच उपक्रम आहे. यामध्ये सहभागी धावपटूला "सीड्‌स बॉल्स' दिले जातील. स्पर्धेच्या मार्गावरील मोकळ्या जागेत हे "सीड्‌स बॉल्स' ते टाकतील. पावसाळ्याच्या सुरवातीलाच हा उपक्रम होत असल्याने त्याचा फायदा वृक्ष लागवडीसाठी होणार आहे. 

वृक्षाथॉनविषयी.... 

* ता. 10 जून 
* प्रारंभ आणि समाप्ती : महावीर जैन विद्यालय (बीएमसीसी रस्ता) 
* ऑनलाइन प्रवेश नोंदणी : Townscript.com 
* अधिक माहितीसाठी संपर्क : 8329540663 आणि 7219639210 

Web Title: Come on run for the environment