"कॉम्रेड्‌स' मॅरेथॉन 12 तासांत पूर्ण 

सागर शिंगटे 
मंगळवार, 19 जून 2018

पिंपरी : जगातील सर्वांत खडतर मॅरेथॉनमध्ये गणना होत असलेल्या दक्षिण आफ्रिकेतील 90.2 किलोमीटर अंतराची "कॉम्रेड्‌स' मॅरेथॉन पिंपरी-चिंचवडच्या चंद्रकांत पाटील, किसन पाटील आणि पी. वेणुगोपाल यांनी जवळपास पावणेबारा तासांत पूर्ण केली. यंदा प्रथमच धावत असताना त्यांनी आफ्रिकन भाषेतील "असिजीकी' म्हणजेच "नो-टर्निंग बॅक' हे स्पर्धेचे ब्रीदवाक्‍य सार्थ ठरविले. 

पिंपरी : जगातील सर्वांत खडतर मॅरेथॉनमध्ये गणना होत असलेल्या दक्षिण आफ्रिकेतील 90.2 किलोमीटर अंतराची "कॉम्रेड्‌स' मॅरेथॉन पिंपरी-चिंचवडच्या चंद्रकांत पाटील, किसन पाटील आणि पी. वेणुगोपाल यांनी जवळपास पावणेबारा तासांत पूर्ण केली. यंदा प्रथमच धावत असताना त्यांनी आफ्रिकन भाषेतील "असिजीकी' म्हणजेच "नो-टर्निंग बॅक' हे स्पर्धेचे ब्रीदवाक्‍य सार्थ ठरविले. 

"कॉम्रेड्‌स मॅनेजमेंट असोसिएशन'तर्फे, दक्षिण आफ्रिकेतील पीटर मार्टिनबर्गपासून डर्बनपर्यंत (डाऊन)ची "कॉम्रेड्‌स' मॅरेथॉन भरविण्यात आली. त्या स्पर्धेत जगभरातून जवळपास 19 हजार स्पर्धकांनी सहभाग घेतला. त्यातील केवळ 16 हजार 477 धावपटूंनाच स्पर्धा नियोजित 12 तासांत पूर्ण करता आली. "पीसीएमसी रनर्स'च्या वेणुगोपाळ (वय 50 वर्षे) यांनी 11 तास 20 मिनिटे 48 सेकंद इतकी वेळ नोंदविली. किसन पाटील (46 वर्षे) यांनी 11 तास 47 मिनिटे 42 सेकंद, तर चंद्रकांत पाटील (40 वर्षे) यांनी 11 तास 47 मिनिटे 51 सेकंद इतकी वेळ नोंदवत स्पर्धा पूर्ण केली.  चंद्रकांत पाटील व्यवसायाने आर्किटेक्‍ट असून, पी. वेणुगोपाळ हे टाटा मोटर्समध्ये सेवेत आहेत. तर, किसन पाटील हे लघुउद्योजक आहेत. 

 ""स्पर्धेचा माझ्या दृष्टीने अनुभव थरारक आणि अनोखा राहिला. पहाटे साडेपाच वाजता कडाक्‍याच्या 9 अंश सेल्सिअस तापमानात सुरवात झाली. मार्गावरील प्रत्येक गावांतील नागरिक धावपटूंना नावाने "चिअर अप' करत होते. त्यांना पिण्याचे पाणी, खाद्यपदार्थ उपलब्ध करून देत होते. जवळपास सात-आठ टेकड्या पार करून जावे लागले.''
- चंद्रकांत पाटील, आर्किटेक्‍ट

""काही तरी वेगळे करण्यासाठी आम्ही तिघांनी "कॉम्रेड्‌स'मध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. साधारणतः 10.30 ते 11 तासांत अंतर पूर्ण करण्याचे माझे उद्दिष्ट होते. मार्गातील तब्बल 62 किलोमीटर इतके अंतर चढाई, घाटवळणाचे होते.'' -
- किसन पाटील, लघुउद्योजक

""स्पर्धेपूर्वी आम्ही 6 महिने सराव केला होता. खूप परिश्रम घेतले होते. मानसिक कणखरता, शारीरिक तंदुरुस्तीचा स्पर्धेत संपूर्ण कस लागला,''
- पी. वेणुगोपाळटाटा मोटर्स

तो शेवटचे 4 मिनिटांचे अंतर रंगला 
स्पर्धेचे 90 किलोमीटरचे अंतर पूर्ण केल्यानंतर एका विदेशी धावपटूला शेवटचे 100 मीटरचे अंतर पूर्ण करण्यासाठी रांगताना पाहिले. परंतु, नियोजित वेळेत ते पूर्ण करण्यात त्याला अपयश आले. हे पाहून खूप वाईट वाटल्याचे किसन पाटील यांनी या वेळी नमूद केले. 
 

Web Title: "Commands' marathon completed in 12 hours