व्यावसायिक वाहनांना आता थर्ड पार्टी विमा एक वर्षाचाच

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

पुणे - व्यावसायिक वाहनांबरोबरच खासगी वापराच्या नवीन वाहनांची नोंदणी करताना किमान तीन वर्षांचा थर्ड पार्टी विमा काढणे केंद्र सरकारच्या परिवहन विभागाने बंधनकारक केले होते. परंतु नवीन नियमानुसार आता केवळ एका वर्षाचा थर्ड पार्टी विमा काढावा लागेल. व्यावसायिक वाहनांची विमा रक्कम ही मोठी असल्याने याचा विचार करण्याची विनंती सरकारला करण्यात आली होती. त्यानुसार केंद्र शासनाकडून नव्याने आदेश दिल्याने वाहतूक वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे. 

सप्टेंबर २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या समितीच्या सूचनेनुसार नवीन वाहनांसाठी काढावयाच्या विम्यात बदल करण्यात आला होता. चारचाकी वाहनांसाठी तीन वर्षे तर दुचाकींसाठी पाच वर्षे मुदतीचा विमा काढावा लागत आहे. मात्र व्यावसायिक वाहनातील ट्रकच्या विम्यासाठी २ लाख ४० हजार तर बसच्या विम्यासाठी २ लाख ८० हजार एवढा विमा काढावा लागत होता. ही रक्कम मोठी असल्याने वाहतूक वाहनधारकांनी निर्णयात बदल करण्याची मागणी केली होती.

या निर्णयामुळे वाहतूक व्यावसायिकांचे बजेट कोलमडले होते. परंतु आता या निर्णयामध्ये सुधारणा केल्याने वाहतूकदारांना दिलासा मिळाला आहे.
- बाबा शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माल व प्रवासी वाहतूक महासंघ

Web Title: Commercial Vehicles Third Party Insurance