पिंपरी - हायपरलूप प्रकल्पाच्या माहितीसाठी पीएमआरडीएने आयोजित केलेल्या बैठकीत उपस्थित बाधित शेतकरी.
पिंपरी - हायपरलूप प्रकल्पाच्या माहितीसाठी पीएमआरडीएने आयोजित केलेल्या बैठकीत उपस्थित बाधित शेतकरी.

आयुक्तांच्या अनुपस्थितीने संताप

बेबडओहोळ - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर उभारण्यात येणाऱ्या हायपरलूप प्रकल्पाची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीला ‘पीएमआरडीए’चे आयुक्त किरण गित्ते अनुपस्थित राहिल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. दोन तास बसून राहावे लागल्याने शेतकऱ्यांना येथील चहापाण्यावर बहिष्कार घातला. दिशाभूल करणारा हा प्रकल्प त्वरित रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

पुणे-मुंबई दरम्यानचा प्रवास कमीत कमी वेळात पूर्ण करण्यासाठी महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाद्वारे (पीएमआरडीए) द्रुतगती मार्गालगत हायपरलूप प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पाबाबत शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला होता. या प्रकल्पाबाबतची सर्व तपशीलवार माहिती देण्यासाठी बुधवारी (ता. २३) पिंपरीतील पीएमआरडीएच्या कार्यालयात शेतकऱ्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला किशोर भेगडे, दिलीप ढमाले, भाई भरत मोरे, सुभाष धामणकर, गुलाब धामणकर, गुलाब घारे, जयसिंग ठाकूर, अनंत चंद्रपुड, गुलाब तिकोने, मारुती गोपाळे, मनोज बोडके, साहेबराव बोडके, गणेश बोडके, निर्गुण बोडके, नीलेश मुऱ्हे, प्रवीण गोपाळे, विश्वनाथ शेलार यांच्यासह चाळीस शेतकरी उपस्थित होते; परंतु आयुक्त गित्ते बैठकीला उपस्थित न राहिल्याने शेतकऱ्यांनी येथील कार्यालयातील चहापानावर बहिष्कार घातला. त्यांनी मागण्यांचे निवेदन पीएमआरडीएचे अधीक्षक अभियंता चंद्रकांत जावळे व कार्यकारी अभियंता भरतकुमार बाविस्कर यांच्याकडे दिले.  

शेतकरी हक्क कृती समितीच्या वतीने बाधित शेतकऱ्यांनी आपापल्या समस्या समितीचे अध्यक्ष सुभाष धामणकर यांना मांडल्या. तसेच प्रकल्प रद्द न झाल्यास जनआंदोलन उभारण्याचा इशाराही दिला. या संदर्भात लवकरच सोमाटणे येथे सर्व बाधित शेतकऱ्यांची बैठक घेऊन दिशा ठरवली जाणार आहे, असे धामणकर यांनी सांगितले. 

बाधित शेतकऱ्यांच्या मागण्या 
 हायपरलूप प्रकल्प रद्द करावा
 शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारला दोन दिवसांत सादर कराव्यात 
 प्रकल्पासाठी बळजबरी केल्यास पुढील परिणामास पीएमआरडीए          जबाबदार राहील

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गालगत होणारा हायपरलूप प्रकल्प शेतकऱ्यांची दिशाभूल करणारा आहे. त्यामुळे तो तातडीने रद्द करावा.
- ॲड. दिलीप ढमाले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com