पुणे : आयुक्तांनी भाजी खरेदीला सांगवीत यावे - प्रशांत शितोळे

रमेश मोरे
बुधवार, 4 एप्रिल 2018

जुनी सांगवी (पुणे) : जुनी सांगवीतील मुळा व पवना नदीतील जलपर्णीमुळे सांगवी परिसरात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर झाली आहे. गेली दोन महिन्यांपासुन फोफावलेल्या जलपर्णीकडे आरोग्य विभागाने कानाडोळा केला आहे.

सांगवीकरांना संध्याकाळी घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. सार्वजनिक ठिकाणी डासांचा उपद्रव वाढला आहे. तक्रारी निवेदने देऊनही पालिका प्रशासनाकडून या गोष्टीकडे दुर्लक्ष केले आहे. याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पिंपरी चिंचवड कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांनी जुनी सांगवीत सहपरिवार सायंकाळी भाजी खरेदीला यावे या आशयाचे निवेदनातुन निमंत्रण दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, नागरीकांना डासामुळे घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे.मागील आठवड्यात जलपर्णी काढण्याची मागणी करूनही ती पूर्ण होताना दिसत नाही.तर डासांपासुन नागरीकांच्या बचावासाठी धुरीकरण व औषध फवारणी नियमित होत नाही.आपण नागरीकांना किती त्रास होतो हे पाहण्यासाठी आरोग्य अधिकाऱ्यासह जुनी सांगवीत भेट द्यावी. हे आग्रहाचे निमंत्रण आहे.असे निवेदनात म्हटले आहे.

Web Title: Commissioner should came to sangavi to buy vegetables