आदर्श क्रांती संघटनेतर्फे 20 जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा

marraige
marraige

सासवड (जि.पुणे) - आदर्श क्रांती संघटनेच्या वतीने दरवर्षीवर्षीप्रमाणे काल सायंकाळी मोफत बिगरहुंडा व सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात पार पडला. यंदाच्या सलग 12 व्या वर्षी 20 जोडप्यांचे विवाह एकाच मंडपात संपन्न झाले. यानिमित्त श्रीक्षेत्र नारायणपूरचे नारायण महाराज, खासदार सुप्रिया सुळे यांनी वधुवरांस शुभाशीर्वाद दिले. 

सासवड (ता. पुरंदर) येथील पुरंदर हायस्कूलच्या प्रांगणात हा सामुदायिक विवाह सोहळा मोठ्या गर्दीत, लगीनघाईत व उत्साही वातावरणात झाला. आदर्श क्रांती संघटनेचे संस्थापक संजय ज्ञानोबा जगताप यांनी प्रास्ताविक केले, तर बाळासाहेब भिंताडे यांनी स्वागत केले. 

या विवाह सोहळ्यात सहभागी वधुवरांस संपूर्ण पोशाख, संसारोपयोगी भांडी, बूट, चप्पल, घड्याळ, मुंडवळ्या, बाशिंगे आदी देण्यात आली. तसेच विवाह सोहळ्यास उपस्थित राहणाऱ्या वऱहाडींना चांगले भोजन दिले. त्याशिवाय नवरदेवांची मिरवणूक, मंडप, स्पिकर्स आदीही खर्च संघटनेने केला. 

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जालींदर कामठे, दिबंगर दुर्गाडे, सुदाम इंगळे, शिवाजी पोमण, आर. एन. जगताप, विठ्ठल झेंडे, का. दी. मोरे, हेमंतकुमार माहूरकर, दत्ता झुरंगे, विराज काकडे, राहुल शेवाळे, जयदिप बारभाई, सचिन भोंगळे, पप्पू भोंगळे, श्यामकांत भिंताडे, पुष्कराज जाधव, माणिक झेंडे, अरुणअप्पा जगताप आदी मान्यवरही उपस्थित होते. 

यावेळी खा. सुळे म्हणाल्या, अलीकडे काही वर्षात बऱयाच ठिकाणी सामुदायिक विवाहात सहभागाचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र तरीही संजय जगताप व टिमने एक तप हा उपक्रम सुरु ठेवल्याचे कौतुक वाटते. समाजाला या अशा खर्चाच्या बचतीची गरज आहे. यावेळी नारायण महाराज यांनी सांगितले, मी इतर विवाहांना अजिबात जात नाही. फक्त सामुदायिक विवाह सोहळा असेल तरच जातो.

520 जोडप्यांना लाभ..
आतापर्यंत या सोहळ्यात 11 वर्षात सुमारे 520 जोडप्यांचे विवाह लावण्यात आले. त्यातून कोट्यवधी रुपयांचा खर्च वाचला. शिवाय सहभागी जोडप्यास शासनाच्या शुभमंगल योजनेअंतर्गत 10 हजार रुपयांचे अनुदान दिले जाते, असेही आदर्श क्रांती संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com