20 जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा संपन्न

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

टाकवे बुद्रुक - फळणे फाटा येथे तपोवन फार्म येथे भव्य मंडपात सामुदायिक विवाह सोहळा संपन्न झाला. आंदर मावळ वारकरी संप्रदायाच्या मार्गदर्शनाखाली आंदर मावळ सोहळा समिती व मावळ प्रबोधिनी यांच्या पुढाकाराने हा सोहळा संपन्न झाला. २० जोडपी विवाहबद्ध झाली, वऱ्हाडी मंडळीनी वधूवरांना शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद दिले. दुपारी १२ वाजून ३० मिनिटांनी साखरपुडा सभारंभ संपन्न झाला. सरपंच सुप्रिया मालपोटे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. मिष्टान्न भोजनाचा वऱ्हाडी मंडळी आस्वाद घेतला. त्यानंतर सुवासिनीने हसतमुखाने व आनंदाने वधूवरांना हळदी लावली. 

ढोल लेझीम व बॅण्ड पथकाच्या निनादात वरराजांची आकर्षक मिरवणूक काढली. विवाह प्रसंगी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाचे माजी सभापती अतिष परदेशी यांनी स्वागत केले. मावळ प्रबोधिनीचे संस्थापक रविंद्र भेगडे यांनी प्रास्ताविक केले. माजी आमदार दिगंबर भेगडे व माजी मंत्री मदन बाफना यांनी शुभेच्छा दिल्या. रोहीदास महाराज धनवे यांनी आशीर्वाद दिले. भगवान भसे यांनी सुत्रसंचालन केले. 

सर्व वधूवरांना पोशाख, संसारोपयोगी भांडी देण्यात आली. सर्व मान्यवरांनी सामुदायिक विवाह सोहळ्याची गरज असून पुढील काळात अधिक सोहळे पार पडण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज विशद केली. 

Web Title: Community marriage ceremony of 20 couples