वाडा येथे सामुदायिक विवाह सोहळा संपन्न

राजेन्द्र लोथे
सोमवार, 7 मे 2018

वाडा(खेड) - गावचे दिवंगत सरपंच सुनील केदारी यांच्या पुण्यस्मरणा निमित्त धर्मराज प्रतिष्ठान वाडा व सुनील केदारी मित्र मंडळाच्या वतीने आयोजित सामुदायिक विवाह सोहळ्यात 13 जोडपी विवाहबद्ध झाली.

वाडा(खेड) - गावचे दिवंगत सरपंच सुनील केदारी यांच्या पुण्यस्मरणा निमित्त धर्मराज प्रतिष्ठान वाडा व सुनील केदारी मित्र मंडळाच्या वतीने आयोजित सामुदायिक विवाह सोहळ्यात 13 जोडपी विवाहबद्ध झाली.

गेली आठ वर्षे सुरू असलेल्या विवाहसोहळ्याचे हे नववे वर्ष असून, येथील कर्मवीर विद्यालयाच्या भव्य प्रांगणात ही सोहळा पार पडला. यावेळी माजी आमदार दिलीप मोहिते, जिल्हा दूध संघाचे संचालक चंद्रशेखर शेटे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप मेदगे, जिल्हा परिषद सदस्य, तनुजाताई घनवट, अतुलभाऊ देशमुख, माजी सदस्य अनिल राक्षे, पंचायत समितीचे उप सभापती अमोलदादा पवार, सदस्य भगवान पोखरकर, रामदास ठाकूर, चंद्रकांत इंगवले, सरपंच रघुनाथ लांडगे, उप सरपंच लक्ष्मण खानविलकर, सदस्या कुमुदिनी केदारी, डॉ शीतल हुंडारे, अक्षय केदारी, जाकीर तांबोळी, उमेश वाडेकर, शिवाजीराव वाळुंज, काळूराम सुपे, महेश नेहरे यांसह तनिष्का गटाच्या सदस्या व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या सोहळ्यात आयोजकांचे वतीने वधू वरांसाठी पोषाख, विवाहाचे सर्व साहित्य, पाच भांडी तसेच वऱ्हाडी मंडळींसाठी सुग्रास भोजन देण्यात आले. त्याचप्रमाणे मान्यवरांच्या हस्ते प्रत्येक नवरा नवरीला आंब्याचे रोपटे देण्यात आले. विविध मान्यवरांच्या शुभेच्छा झाल्यावर विवाह सोहळा संपन्न झाला.

Web Title: Community weddings celebrated at Wada