कंपन्यांसाठी डेटा चोरीची डोकेदुखी!

Company-Data-Theft
Company-Data-Theft

पुणे - नामांकित आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याने नोकरी सोडताना संबंधित कंपनीची गोपनीय माहिती (डेटा), ई-मेल काढून घेतले. तोच डेटा दुसऱ्या कंपनीसाठी वापरल्याने पूर्वीच्या कंपनीचे ४० ते ५० लाख रुपयांचे नुकसान झाले.

तसेच दिल्लीतील एका डिजिटल पेमेंट कंपनीच्या संस्थापकाचा वैयक्तिक डेटा चोरून त्यांच्याकडून खंडणी वसूल करण्याचाही प्रयत्न झाला. डेटा चोरीच्या अशा घटनांमुळे अनेक कंपन्या धास्तावल्या असून, या गुन्ह्यांमध्ये यंदा वाढ झाली आहे. कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांकडून ९८ टक्के, तर बाहेरील व्यक्तींकडून केवळ २ टक्के डेटा चोरी होत असल्याचे वास्तव आहे.

कंपनीसाठी त्यांची गोपनीय व इलेक्‍ट्रॉनिक माहिती (डेटा) मौल्यवान असते. हा डेटा प्रतिस्पर्ध्यांच्या हाती लागल्यास काही कंपन्यांवर दिवाळे निघण्याची वेळही येते. पुण्यातही गेल्या दोन तीन वर्षांपासून डेटा चोरीचे अनेक प्रकरणे सायबर गुन्हे शाखेकडे येत आहेत. अनेक कंपन्यांना डेटा चोरीमुळे आर्थिक फटका तर बसतोच, त्याशिवाय त्यांची प्रतिमा मलिन होऊन कंपन्यांचे अनेकांशी हितसंबंधही बिघडत आहेत.

बॅंका, शैक्षणिक संस्था, कंपन्या व खासगी कंपन्यांमध्ये डेटा चोरी होते. पैसे मिळविणे, बदनामी किंवा प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने हे प्रकार घडतात. बहुतांश प्रकरणांमध्ये संबंधित कंपन्या, संस्थांमधील व्यक्तींचाच समावेश असतो. त्यामुळे डेटा चोरी होऊ नये, यासाठी कंपन्यांनी पुरेशा उपाययोजना करण्याची गरज आहे.
- जयराम पायगुडे, पोलिस निरीक्षक, सायबर सेल

डेटा चोरी झालेल्या कंपन्यांना तोटा सहन करावा लागतो, तर प्रतिस्पर्ध्यांना अप्रत्यक्ष त्याचा फायदा होतो. त्यामुळे कंपन्यांनी माहिती तंत्रज्ञान कायद्याची जाणीवपूर्वक अंमलबजावणी केली पाहिजे. तसेच कर्मचाऱ्यांच्या करारामध्येच ‘डेटा सिक्‍युरिटी पॉलिसी’चा समावेश केला पाहिजे. 
- ॲड. राजस पिंजण, सायबर लॉ आणि सायबर सिक्‍युरिटी तज्ज्ञ

तीन वर्षांची शिक्षा ! 
एखाद्या कंपनी अथवा संस्थेत डेटा चोरी केल्याचे आढळल्यास संबंधीत व्यक्तीवर ‘माहिती तंत्रज्ञान कायदा : २००३’ अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊ शकतो. या कायद्याच्या ‘कलम ६६ ब’नुसार तीन वर्षांपर्यंतचा कारावास आणि एक लाख रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा होऊ शकते.

का आणि कशासाठी चोरी?
 कंपनीविषयी कर्मचाऱ्यांमध्ये असमाधान असणे
 बॅंका, कंपन्यांची सांख्यिकीची माहिती चोरून विकणे
 स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी डेटा चोरी  
 कंपन्यांची ‘स्ट्रॅटेजी’ बाह्य कंपन्यांना पुरविणे

ही काळजी घ्यावी!
 कंपनीची धोरणांची ‘इन्फर्मेशन टेक्‍नॉलॉजी कायदा : २००३’ नुसार अंमलबजावणी करणे
 कर्मचाऱ्यांबरोबरील करारामध्येच ‘डेटा सिक्‍युरिटी पॉलिसी’चा उल्लेख करावा
 ई-मेल पासवर्डची एकमेकांना देवाण-घेवाण करता येऊ नये
 संशयास्पद हालचाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर बारकाईने लक्ष ठेवणे
 ई-मेल फॉरवर्डर नसल्याची खात्री करून घेणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com