फसवणुक झालेल्या कंपनीचे पैसे सायबर पोलिसांमुळे मिळाले परत 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 एप्रिल 2019

पुणे : खासगी कंपनीस बनावट ई-मेल पाठवून चार कोटी 13 लाख रुपये हाँगकाँगमधील दुसऱ्याच एका बँक खात्यामध्ये भरण्यास सांगून कंपनीची फसवणूक करण्याचा प्रकार औंध येथील कंपनीमध्ये घडला होता. याप्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने केलेल्या प्रयत्नामुळे संबंधीत कंपनीस त्यांची रक्कम पुन्हा मिळवून देण्यात यश आले. 

'टी सिस्टीम आयटीसी इंडिया'असे फसवणूक झालेल्या कंपनीचे नाव आहे. संबंधीत कंपनीस अनोळखी व्यक्तीने बनावट ई-मेल पाठवून डच बँकेच्या औंध येथील शाखेतुन हाँगकाँग येथील स्टँडर्ड चार्टड बॅँकेत चार कोटी 13 लाख रुपये मागील वर्षी 31 ऑगस्ट भरण्यास सांगितले. त्यानुसार, कंपनीने रक्कम पाठविली. त्यानंतर कंपनीने संबंधीत कंपनीकेड पैसे जमा केल्याबाबत खात्री करण्यासाठी संपर्क साधला, त्यावेळी त्यांची फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार, त्यांनी पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार दिली.

दरम्यान, या प्रकारानंतर सायबर पोलिसांनी हाँगकाँगमधील संबंधीत बँकेस व हाँगकाँग पोलिसांना कंपनीचे पैसे जमा झालेले खाते गोठविण्याची मागणी केली. तसेच कंपनीची फसवणूक करुन पैसे लंपास करण्यात आल्याबाबतच कागदपत्रे त्यांच्याकडे पाठविली. तसेच फसवणुकीमधील रक्कम तातडीने कंपनीच्या खात्यावर पुन्हा जमा करावी, अशी विनंती करणारा दावा हाँगकाँगमधील दिवाणी न्यायालयात केला होता. त्यानुसार न्यायालयाने बँकेस पैसे परत करण्याचे आदेश दिले. त्यानंतर कंपनीला पैसे परत मिळाले. 

आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहाय्यक पोलिस आयुक्त निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राधिका फडके, सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर पानमंद, प्रसाद पोतदार यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: the company get back money lost in the cheating due to help of cyber police