आराखड्याप्रमाणे बांधकाम न केल्याने सोसायटीला 14 लाखांची नुकसान भरपाई 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मे 2019

मंजूर आराखड्याप्रमाणे सोसायटीचे बांधकाम न करता सदनिकाधारकांना योग्य सोयी-सुविधा न दिल्याप्रकरणी बिल्डर आणि जागा मालकाला राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या पुणे खंडपीठाने दणका दिला आहे. संबंधित सोसायटीला बिल्डरने 14 लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, असा आदेश खंडपीठाने दिला आहे. 

पुण : मंजूर आराखड्याप्रमाणे सोसायटीचे बांधकाम न करता सदनिकाधारकांना योग्य सोयी-सुविधा न दिल्याप्रकरणी बिल्डर आणि जागा मालकाला राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या पुणे खंडपीठाने दणका दिला आहे. संबंधित सोसायटीला बिल्डरने 14 लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, असा आदेश खंडपीठाने दिला आहे. 

''सामाईक व मोकळ्या जागा, पार्किंग आणि मुख्य प्रवेशद्वाराच्या वापरात कोणतेहा अडथळा निर्माण करून नये. तसेच तेथे येण्या-जाण्याचा हक्क नाकारू नये'', असा प्रतिबंधात्मक आदेश खंडपीठाने बिल्डर आणि जागा मालकाला दिला आहे. या प्रकरणी सिंहगड रस्ता येथील शिवसागर फेज एक सहकारी गृह रचना संस्था मर्यादित संस्थेने शिवम कन्स्ट्रक्‍शन कंपनीचे भागीदार अतुल मोगल आणि जागा मालकाविरुद्ध जिल्हा ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल केली होती. त्यावर मंचाने एप्रिल 2004 ला निकाल दिला होता. संबंधित बिल्डरला सोसायटीच्या नावे खरेदीखत करण्याचे व फ्लॅट खरेदीधारकांकडून घेतलेल्या पैशांचा हिशोब द्यावा, असे त्या निकालात नमूद होते. मात्र सोसायटीच्या इतर मागण्या मान्य करण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळे या आदेशाविरुद्ध सोसायटीने अॅड. ज्ञानराज संत यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे अपील दाखल केले होते. 

बिल्डरने सोसायटीच्या सभासदांना वेगवेगळ्या करारनाम्यांनुसार सदनिका विकल्या. आश्‍वासनाप्रमाणे सोयी - सुविधा, सोसायटी नोंदणी व सोसायटीच्या नावे कन्व्हेन्स डिड नोंदवून दिले नाही. मंजूर आराखडा व नकाशानुसार बांधकाम न करता पार्किंगच्या जागेत व मोकळ्या जागेत अनेक ठिकाणी अनधिकृतपणे भिंती उभारून त्यातील काही जागा काही रहिवाशांना अनधिकृतपणे विकल्या, अशी तक्रार करण्यात आली होती. बिल्डरने आदेशाच्या दिनांकापासून दोन महिन्याच्या आत भरपाई न दिल्यास नऊ ऐवजी संपूर्ण रक्कम 12 टक्के व्याजाने द्यावी लागेल. तसेच अपिलाच्या खर्चापोटी 25 हजार रुपये सोसायटीला द्यावे, असे आदेशात नमूद केले आहे.

Web Title: Compensation to the Society due to construction is buld as Per Layout