स्पर्धा परीक्षा वाचनालयात विद्यार्थी संख्या जास्त, अपुरी व्यवस्था

रमेश मोरे
बुधवार, 11 एप्रिल 2018

विद्यार्थ्यांची होणारी अडचण लक्षात घेऊन अधिकाऱ्यांशी चर्चा करून येथील समस्यावर तोडगा काढला जाईल.

- नगरसेवक संतोष कांबळे, सदस्य शहर सुधारणा समिती

जुनी सांगवी : जुनी सांगवी येथील महापालिकेच्या शहीद अशोक कामठे यांच्या नावाने सुरू केलेल्या ग्रंथालयात विद्यार्थ्यांना बैठक व्यवस्थेसाठी गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याची तक्रारी वाढत आहेत .येथील आसन क्षमता १४४ इतकी असून तब्बल २३८ जणांना यात प्रवेश दिला आहे. जागा मर्यादेमुळे विद्यार्थ्यांमधेच जागेवरून वादावादी व कुरबुरीच्या तक्रारी वाढत अाहेत. विद्यार्थी सांगतात की,महापालिकेने येथील सर्व विद्यार्थ्यांचा प्रवेश मार्च २०१९ पर्यंत निश्चित केलेला असूनही वरिष्ठांच्या आदेशाचेही पालन केले जात नसून नव्या जुन्या विद्यार्थ्यांचा वाद उफाळून येत आहे.

मोजक्या विद्यार्थ्यांना हाताशी धरून ईतर विद्यार्थ्यांना सापत्नक वागणूक केंद्र चालक देत असून केंद्र चालक मनमानी करत असल्याची लेखी गा-हाणे  विद्यार्थ्यांनी माजी नगरसेवक प्रशांत शितोळे यांच्याकडे मांडले आहे. आसन क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी प्रवेश करून घेवुन ऐन स्पर्धा परिक्षेच्या वेळी कुरबुरी वाढल्याने त्याचा अभ्यासावर परिणाम होत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगीतले.यात संबंधित केंद्रचालिका विद्यार्थ्यांना पुस्तके देवाण घेवाण व्यवस्थित करण्यात येत नाही.

विद्यार्थ्यांना अपमानित करून बोलणे असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. याबाबत पालिका प्रशासन व संबंधित केंद्रचालकाशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही. स्पर्धा परिक्षा पूर्व तयारीसाठी इतर भागात जावे लागायचे यासाठी सांगवीतच शहीद अशोक कामठे यांच्या नावाने हे स्पर्धा परिक्षा अभ्यास केंद्र स्थापन करण्यात आले आहे. मात्र, येथील अनागोंदी कारभार व अपु-या व्यवस्थेमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाऐवजी इतर गोष्टींना सामोरे जावे लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

याबाबत माजी नगरसेवक प्रशांत शितोळे म्हणाले, विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता योग्य नियोजन व्हायला हवे.संबंधित व वरिष्ठांशी मी या विषयावर चर्चा करणार आहे.जागेच्या वाढीव उपलब्धतेसाठी मारूती मंदीर येथे व्यवस्था असुनही ते सुरू करण्यात आलेले नाही. प्रशासनाशी चर्चा करून यातून मार्ग काढला जाईल. 

Web Title: Competitive Exam Library Students Mismanagement