कामगारांच्या मुलांसाठी स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षणवर्ग

राजकुमार थोरात
मंगळवार, 17 जुलै 2018

वालचंदनगर : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाने कामगारांच्या मुलांसाठी 'स्पर्धा परीक्षेच्या पूर्व तयारी प्रशिक्षण' योजना सुरु केली आहे. इंदापूर व बारामती तालुक्यामध्ये या योजनेचे वर्ग सुरु करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे वालचंदनगरचे कल्याण निरीक्षक संदीप गावडे यांनी दिली.

वालचंदनगर : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाने कामगारांच्या मुलांसाठी 'स्पर्धा परीक्षेच्या पूर्व तयारी प्रशिक्षण' योजना सुरु केली आहे. इंदापूर व बारामती तालुक्यामध्ये या योजनेचे वर्ग सुरु करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे वालचंदनगरचे कल्याण निरीक्षक संदीप गावडे यांनी दिली.

स्पर्धा परीक्षेची तयारी करुन घेण्यासाठी खासगी क्लासेसकडून भरमसाट शुल्क आकरण्यात येत असल्यामुळे कामगारांच्या क्लास लावण्यात अनेक अडचणी येत असतात. कामगारांच्या मुलांनी स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवावे. तसेच प्रशासनामध्ये कामगारांच्या मुलांचा सहभाग वाढवा या उद्देशाने नाशिक मधील स्पेक्ट्रम अॅकॅडमी यांच्या सहकार्याने कामगार व त्यांच्या कुंटूबातील सदस्यांसाठी स्पर्धा परीक्षेच्या पूर्व तयारी प्रशिक्षण योजना सुरु केली आहे.

या योजनेतंर्गत केंद्रीय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, बँक भरती परीक्षा, रेल्वे भरती परीक्षा, एमबीए प्रवेशाची पूर्व परीक्षा, लिपिक भरती परीक्षा, पोलिस भरती परीक्षेची तयारी करुन घेतली जाणार आहे. या पुर्व परीक्षेचा वर्ग ऑगस्ट मध्ये इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर व बारामती तालुक्यातील बारामती शहरासह सुरु करण्यात येणार आहेत. या प्रशिक्षण योजनेचा लाभ विविध कंपनीतील कामगार, साखर कारखान्यातील कामगार, महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळातील कर्मचारी, दुध संघातील कर्मचारी, महावितरण चे कर्मचारी, विविध विमा कंपन्यांचे कर्मचारी, विविध बँकेतील कर्मचारी व ज्या कामगारांचा जून महिन्यामध्ये 12 रुपये कामगार कल्याण निधी कपात झालेले सर्व कामगार व त्यांच्या कुंटूबातील सदस्य या योजनेसाठी पात्र राहणार आहेत. 

या योजनेमध्ये कोणतीही शैक्षणिक शुल्क द्यावे लागणार नसून प्रशिक्षण कालावधीमध्ये पाठ्यपुस्तके संस्थेमार्फत मोफत पुरविण्यात येणार आहेत. हा प्रशिक्षण कालावधी  आभ्यासक्रमानूसार दोन ते आठ महिन्यांचा असणार असुन अधिक माहितीसाठी कामगार कल्याण मंडळाचे कल्याण निरीक्षक संदीप गावडे यांच्या 9175434376 या मोबाईल क्रंमाकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रशिक्षणापूर्वी निवड परीक्षा 

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या स्पर्धा परीक्षेच्या पूर्व तयारी प्रशिक्षण योजनेतंर्गत सुरवातील कामगार व त्यांच्या कुटूंबातील सदस्याकडून अर्ज मागविण्यात येणार असून सर्व इच्छुक उमेदवारांची प्रशिक्षण योजनेसाठी निवड परीक्षा घेण्यात येणार असून उर्तीण होणाऱ्या उमेदवारांचीच प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येणार असल्याचे गावडे यांनी सांगितले.

Web Title: Competitive Examination Training Course for workers child