खोदाईमुळे नागरिकांचे हाल होत असल्याची तक्रार

बाबा तारे
मंगळवार, 3 जुलै 2018

प्रभाग आठ मधील औंधगाव पायठा मित्र मंडळ येथे मागील तीन महिन्यांपूर्वी पुणे महानगरपालिकेच्या वतीने पिण्याच्या पाण्याची वाहीनी टाकण्यात आली आहे. या कामासाठी तेव्हा रस्त्याची खोदाई करण्यात आली होती परंतु आजपर्यंत खोदलेल्या जागेवर व्यवस्थित काम केले  नाही

औंध - प्रभाग आठ मधील औंधगाव पायठा मित्र मंडळ येथे मागील तीन महिन्यांपूर्वी पुणे महानगरपालिकेच्या वतीने पिण्याच्या पाण्याची वाहीनी टाकण्यात आली आहे. या कामासाठी तेव्हा रस्त्याची खोदाई करण्यात आली होती परंतु आजपर्यंत खोदलेल्या जागेवर व्यवस्थित काम केले  नाही.

हा रस्ता औंधगावातील मुख्य रस्ता असून या रस्त्यालगत पुणे महानगरपालिकेची शाळा, ज्येष्ठ नागरिकांचे विरंगुळा केंद्र, औंध कुटी रुग्णालय, गणपती मंदिर, महानगरपालिकेचे मारुतराव गायकवाड उद्यान आहे, त्यामुळे या रस्त्यावरून मोठया प्रमाणात मोठी वाहने, शाळेची मुले, रुग्ण, ज्येष्ठ नागरिक, महिला, पुरुष हे  ये-जा करत असतात.

सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने  नागरिकांना या खोदाईमुळे  त्रास सहन करावा लागत  आहे. औंध मधील लोकप्रतिनिधी कडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे या ठिकाणी मोठया प्रमाणात अपघात होण्याची शक्यता आहे, तरी प्रशासनाने तत्काळ याची दखल घेऊन या खोदाई झालेल्या भागाचे प्रशासनाने तत्काळ दुरुस्ती काम करून द्यावे व नागरिकांना होणारा त्रास कमी करावा, अशी मागणी माजी महापौर दत्तात्रय गायकवाड यांनी केली आहे. 

परिहार चौक ते औंधगाव रस्त्यावर चोवीस तास पाणीपुरवठा योजनेची जलवाहीनी टाकण्यात आल्याने खोदकाम करण्यात आले होते. परंतु, आता खोदकाम बुजवण्यात आले असून याठिकाणी रस्त्याचे काम काही दिवसात करण्यात येणार आहे. केवळ राजकीय विरोधापोटी औंधमधील काँक्रीट रस्त्यांना विरोध केला जात आहे. परंतु येत्या काही दिवसातच येथील रस्त्याचे काम पुर्ण केले जाईल. निधी उशिरा मिळाल्याने या जलवाहीनीच्या कामाला उशिर झाला.परंतु या रस्त्याचे काम लवकरच पुर्ण होईल असे नगरसेविका अर्चना मुसळे यांनी सांगितले आहे.

Web Title: Complaint about the incident of citizens due to excavation