आयडीयल एज्युकेशन सोसायटीविरुद्ध तक्रार दाखल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 जुलै 2018

वानवडीतील एका शाळेत विविध शुल्लक कारणाकरीता दंड आकारला जात होता. वर्तमानपत्रात बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर शाळेला तो नियम रद्द करावा लागला होता. हे प्रकरण संपत नाही तोपर्यंत आणखी एका शाळेसंबंधी प्रकरण पुढे आले आहे.

उंड्री : वानवडीतील एका शाळेत विविध शुल्लक कारणाकरीता दंड आकारला जात होता. वर्तमानपत्रात बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर शाळेला तो नियम रद्द करावा लागला होता. हे प्रकरण संपत नाही तोपर्यंत आणखी एका शाळेसंबंधी प्रकरण पुढे आले आहे.

हडपसर  गुलामअली नगरमधील आयडियल एज्युकेशन ट्रस्ट 
विरूद्ध लोकहित फाऊंडेशन पुणेचे संस्थापक अध्यक्ष अजहर अहमद खान यांनी शिक्षण विभाग पुणे यांच्याकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या. त्याची दखल घेत शिक्षण विभागाने त्रिसदस्यीय समिती बसविली असून त्यात अध्यक्ष  सुरेश उचाळे, जयेश शेंडकर. निर्मला कोषटी,  सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. उपरोक्त समितीने जागेवर जाऊन तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने चौकशी करून आठ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश समितीला देण्यात आले आहेत.

गैरकारभार, मनमानी पद्धतीने फी वाढ, फी वाढीचा हिशोब एखाद्या विद्यार्थ्यांचा पालकांनी मागितल्यास धमकी देणे, विद्यार्थ्यांस शाळेतून काढून टाकण्याची धमकी देणे, शाळेला शासकीय अनुदान मिळून ही ते मिळत नसल्याचे शिक्षण विभागाला कळविणे.

Web Title: Complaint against IDEAL Education Society