सर्वसामान्य जनता कंटाळली वाळू माफियांना

युनूस तांबोळी
शुक्रवार, 4 मे 2018

टाकळी हाजी (शिरूर, पुणे): शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात अवैद्य वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारीत वाढ होत आहे. सर्वसामान्य जनता वाळू माफियांना कंटाळली असून, लेखी स्वरूपाच्या तक्रारी तहसील कार्यालयात येऊ लागल्या आहेत. यावर महसूल विभाग कोणती कारवाई करणार याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.

टाकळी हाजी (शिरूर, पुणे): शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात अवैद्य वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारीत वाढ होत आहे. सर्वसामान्य जनता वाळू माफियांना कंटाळली असून, लेखी स्वरूपाच्या तक्रारी तहसील कार्यालयात येऊ लागल्या आहेत. यावर महसूल विभाग कोणती कारवाई करणार याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.

शिरूर तालुक्यातून कुकडी व घो़डनदी सध्या पाण्याने भरून वाहत आहे. नदीला पाणी असल्याने वाळू उपसा करता येत नाही. मात्र, उन्हाळ्यात ओढे-नाले पाण्याने कोरडे पडले आहेत. परीसरात तयार झालेली वाळू उपश्याकडे हे वाळू माफीया वळाले आहेत. रात्रीच्या वेळी चोरून अशा ओढ्यांमध्ये वाळू उपसा सुरू आहे. या भागातून येणाऱ्या वाळूच्या गाड्या राष्ट्रीय महामार्गावर अडवून महसूल विभागाने चांगलाच दबदबा निर्माण केला होता. त्यांच्या या कारवाईमुळे हा परीसर वाळू माफीयांपासून शांत झाला होता. इमारतीच्या बांधकामासाठी सध्या वाळूची मोठ्या प्रमाणात गरज निर्माण झाली आहे. अशा बांधकाम ठेकेदारांना सध्या वाळूची जास्त टंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळेच वाळू माफीयांनी ओढ्या नाल्याची वाळू उपसा सुरू केला आहे.

सविंदणे (ता. शिरूर) या परीसरात पावसाच्या पाण्याने ओढे नाले तयार झालेले आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात वाळू सापडू लागली असून, अवैद्य वाळू उपसा सुरू असल्याची तक्रार नुकतीच एका ग्रामस्थाने शिरूर तहसील कार्यालयात केली आहे. तक्रारीनंतर या परीसराची पहाणी करून खातरजमा करत दंड वसूल करण्याची जबाबदारी महसूल विभागाची आहे, अशी लेखी स्वरूपाची तक्रार करून कोणती कारवाई होणार? याकडे या परीसरातील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, या बाबत शिरूरचे तहसीलदार रणजीत भोसले म्हणाले की, संबधीत अर्जाची तपासणी करून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात येईल. खातरजमा करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

वाळू उपसा अन कारवाई...
या भागात सरकारी खात्यात महत्वाच्या पदावर काम करणारे अधिकारी असल्याने व अधिकारी वर्गाशी मैत्रीचे नाते असल्याने कोणत्या प्रकारची कारवाई होईल. हे सांगता येणार नाही. तक्रारदार मात्र मुंबई येथे मंत्रालयासमोर उपोषणाला बसणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे तालुक्यातील महसुल विभागाचे धाबे दणाणल्याचे दिसून येत आहे.

Web Title: complaint against sand mafia in shirur taluka