अभिनेते विक्रम गोखले अडचणीत; फसवणुकीचा गुन्हा दाखल

Complaint filed against veteran Actor Vikram Gokhale in Pune
Complaint filed against veteran Actor Vikram Gokhale in Pune

पुणे/कोळवण : मुळशी तालुक्‍यातील डोंगरगांव येथील गिरीवन प्रोजेक्‍टमध्ये 14 वयोवृध्द नागरिकांची 96 लाख 99 हजार रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी प्रसिध्द चित्रपट अभिनेते विक्रम चंद्रकांत गोखले, जयंत रामभाऊ म्हाळगी आणि सुजाता जयंत म्हाळगी यांच्या विरोधात पौड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आपला या व्यवहारांशी कोणताही संबंध नसल्याचे गोखले यांनी म्हटले आहे.

जयंत प्रभाकर बहिरट (वय.57, रा. कोथरूड) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. डोंगरगांव येथील सुजाता फार्म प्रा.लि गिरीवन प्रोजेक्‍ट ही कंपनी सरकार मान्य कंपनी असल्याची जाहिरात विक्रम गोखले यांनी केली होती. गोखले यांनी खोट्या जाहिराती व प्रलोभने देऊन नागरिकांना आकर्षित केले. तसेच स्वर्गीय रामभाऊ म्हाळगी यांच्या चांगल्या प्रतिमेचा गैरफायदा घेतला. या सर्व 14 जणांना प्लॉटची सरकारी मोजणी झाली असल्याचे सांगून प्लॉट खरेदी करायला लावले. तसेच कायदेशीर बाबीची चिंता करू नका असेही सांगितले. मात्र, जागा घेतल्यानंतर प्लॉटची सरकारी मोजणी खरेदीदारांना गिरीवनतर्फे करून दिली जात नव्हती.

यामुळे या सर्व खरेदीदारांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज करून विना हरकत मोजणी करून द्याव्यात असा अर्ज दाखल केला. त्यावर जिल्हाधिकारी यांनी सकारात्मक आदेश दिला. मात्र, मोजणी करतेवेळी विक्रम गोखले, जयंत म्हाळगी, सुजाता म्हाळगी गैरहजर राहात तसेच हरकत घेत असल्याचे फिर्याददारांच्या निदर्शनास आले व आपली फसवणूक झाली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यानंतर या सर्वानी पौड पोलिसात धाव घेत डायरेक्‍टर जयंत म्हाळगी, सुजाता म्हाळगी व चेअरमन विक्रम गोखले यांच्या विरोधात 420, 465, 468 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, गोखले जानेवारी 2020 पर्यंतच गिरीवनचे चेअरमन होते. 

गिरीवन प्रकल्प गेली तीस वर्ष व्यवस्थित चालू असून काही जमिन मालकांनी त्याच्या जमिनीची मोजणी करुन घेतली असता त्यांना त्यांचा सातबारा व वहीवाट यात फरक असल्याचे अढळून आले. जमिनीची मालकी व वहीवाट या दिवाणी स्वरुपाच्या विषयांमधील फरकांची विसंगती कशी दूर करता येईल याबाबत संबंधित जमिन मालकांबकोबर बोलणे चालू असून कोणाचीही फसवणू करण्याचा गिरीवनचा हेतू नसून याबाबत काही जमिनमालकांनी फौजदारी गुन्हा दाखल केला असून गिरीवन आपली बाजु मांडत आहे असा खुलासा गिरीवन प्रोजेक्‍ट मॅनेजमेंटकडून पत्रकाद्वारे केला आहे.

विक्रम गोखले याबाबत सकाळशी बोलताना म्हणाले, "कंपनीने केलेल्या व्यवहाराशी माझा एक नव्या पैशाचाही संबंध नाही. त्यांच्या बँकांशीही संबंध नाही. विक्रम गोखले यांचे नाव आणि चेहरा वापरल्याने जमिनी विकल्या जातील, एवढ्यासाठी एक सेलिब्रिटी म्हणून मला त्यांनी निमंत्रित केले होते. त्या पलीकडे माझा त्या कंपनीशी संबंध नाही. आता तर मी फिजिकली अनफिट आहे. पण अनेक लोकांना एखाद्याचे नाव मोठे असेल, तर त्याच्याविरोधात जाणे हे शौर्य वाटते, त्याला कोण अडवणार?"

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com