खंडणीबाबत पोलिसांकडे तक्रारी

Police
Police

पुणे - शहरातील व्यापारी, व्यावसायिक, बांधकाम व्यावसायिक, उद्योजकांकडून माथाडी संघटनांच्या नावाखाली खंडणी वसूल केली जात आहे. खंडणी उकळणाऱ्यांवर ठोस कारवाई करावी, अशी मागणी पुणे व्यापारी महासंघाने पुणे पोलिसांकडे केली आहे.  

शहरातील विविध व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक शिवाजीनगर पोलिस मुख्यालयात झाली. पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका, सचिव महेंद्र पितळिया, सूर्यकांत पाठक, रतन किराड, अरविंद कोठारी, मनोज  सारडा, सतीश रहेजा, अजित सांगळे, खुबीलाल मेहता, बिपिन शेठ आदी या वेळी उपस्थित होते. 

व्यापारी प्रतिनिधींनी गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त प्रदीप देशपांडे व पोलिस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे यांच्यापुढे समस्या मांडल्या. देशपांडे यांनी ‘सहकार्यातून सुरक्षिततेकडे’ या उपक्रमांतर्गत दुकानांच्या दर्शनी भागात सीसीटीव्ही लावण्याचे आवाहन केले.

माथाडीच्या नावाखाली खंडणी गोळा करणाऱ्यांवर आतापर्यंत पोलिसांनी गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली आहे. हा प्रकार थांबविण्यासाठी व्यापारी, व्यावसायिकांनीही न घाबरता पोलिसांकडे तक्रार करावी. त्यांचे नाव गुपित ठेवून संबंधित गुन्हेगारावर कडक कारवाई केली जाईल. 
- डॉ. के. वेंकटेशम, पोलिस आयुक्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com