...म्हणून खेड शिवापूर टोलनाक्यावर टोल वसूल करणारांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात येणार

किरण भदे
रविवार, 28 जून 2020

बेकायदा टोलवसुली बद्दल कृतीसमिती पोलिसांकडे तक्रार करणार

नसरापूर (पुणे) : महामार्ग प्राधिकरणाने पाच तालुक्यासाठी टोलमाफीचे लेखी पत्र दिले असताना देखिल खेड शिवापूर टोलनाका व्यवस्थापन टोलवसुली करत असून याबाबत टोलनाका हटाव कृती समिती टोलवसूल करणारांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार देऊन कारवाईची मागणी करणार असल्याचे समितीचे निमंत्रक माऊली दारवटकर व दिलीप बाठे यांनी स्पष्ट केले आहे.
कृती समिती व व्यवसाईक वाहन चालक यांच्यात झालेल्या चर्चेत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी लोकप्रतिनिधींच्या भुमिकेबाबत शंका व्यक्त करुन तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

पुणे जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू होणार...

लाॅकडाउनच्या कालावधीनंतर टोलनाका सुरु झाल्यापासून स्थानिक वाहनांना अडवून त्यांच्याकडून टोलवसुली सुरु करण्यात आली आहे. यामुळे टोलनाक्यावर दररोज वादंग होत असून वाहन चालकांना दमदाटी केली जात असल्याचा आरोप अनेक वाहनचालकांनी केला. याबाबत टोलनाका हटाव कृती समितीने लक्ष घालण्याची मागणी करण्यात आली होती व्यवसायिक वाहन चालकांच्या समस्यांबाबत कृती समितीचे निमंत्रक यांनी आज चर्चा केली. यावेळी माऊली दारवटकर, दिलीप बाठे, अमोल पांगारे, लहुनाना शेलार, ज्ञानेश्वर शिंदे, राजेंद्र मोरे, कृष्णाजी रांजणे, डॉ. संजय जगताप, शुभम यादव आदी कृती समितीचे सदस्य उपस्थित होते. यावेळी दूध, भाजीपाला वाहतुकदार तसेच अन्य व्यवसायिक वाहन चालकांनी तक्रार केल्याने फेब्रुवारी मधील अंदोलनानंतर स्थानिकांना टोलमाफी झाली होती. परंतु, काही महिनेच टोल माफी करण्यात आली. मात्र, गेल्या काही दिवसांपासून जोर जबरदस्तीने टोल वसूल केला जात असल्याचे सांगितले व त्यामुळे रोज वादविवाद होत असल्याची तक्रार केली.

पुण्यातील रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतीच, आता तुम्हीच तुमचे रक्षक व्हा!

 या बाबत माऊली दारवटकर म्हणाले, टोलमाफीसाठी आपले आंदोलन नाही टोल हटवणे हीच आपली प्रमुख मागणी आहे. मात्र, फेब्रुवारीच्या आंदोलनाच्या वेळी केंद्रीय पातळीवर चर्चा करण्यासाठी आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली गेली व त्या वेळी मुख्य निर्णय होई पर्यंत भोर वेल्हे मुळशी, पुरंदर व हवेली या तालुक्यातील वाहनांना टोलमाफी दिली जाईल असे लेखी पत्र दिले आहे. त्यामध्ये कोणत्याही व्यवसायिक वाहनांचा उल्लेख देखिल केलेला नाही. त्यामुळे या स्थानिक वाहनांना देखिल टोलमाफी दिली गेलीच पाहीजे. या वर कृती समिती देखिल ठाम असून याबाबत पत्र नाकारुन जोरजबरदस्तीने टोल वसुली केली जात असल्या बाबत येथील सर्व पक्षाचे लोकप्रतिनिधी, व्यवसायिक वाहन चालक संघटनेचे पदाधिकारी व कृती समिती यांच्या वतीने राजगड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येणार आहे.

जिजा आणि दाजी; वाचा शरद पवार यांच्या लग्नाची गोष्ट!

दिलीप बाठे म्हणाले, व्यवसायिक वाहनचालकांनी निव्वळ टोलवाचवण्यासाठी या अंदोलनात सहभागी न होता. आपल्याला टोल हटवायचा आहे यासाठी सर्व आंदोलनात सहभागी व्हावे असे अवाहन केले. तसेच टोलवरील व्यक्ती आमदार, खासदारांचे नाव घेवून टोलवर दादागिरी करत आहेत त्यांच्यावर संबधित लोकप्रतिनिधींनी बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा असे अवाहन देखिल त्यांनी यावेळी केले.

लोकप्रतिनिधींनी भूमिका स्पष्ट करावी

यावेळी चर्चेत पाचही तालुक्यातील आमदार,खासदार लोकप्रतिनिधी यांच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. ते जाणिवपूर्वक लक्ष घालत नाहीत आंदोलनाला नावा पुरते हजर राहतात असा आरोप करण्यात आला. या नेत्यांनी ते जनतेबरोबर आहेत की नाही हे स्पष्ट करावे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A complaint will be lodged against the toll collectors at Khed Shivapur toll naka