Loksabha 2019  : दक्षता घेतल्यामुळेच तक्रारी नाहीत - जिल्हाधिकारी 

Loksabha 2019  : दक्षता घेतल्यामुळेच तक्रारी नाहीत - जिल्हाधिकारी 

पुणे  - लोकसभा निवडणुकीमध्ये मतदार यादीतून 2014 मध्ये अनेक मतदारांची नावे वगळण्यात आल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे आल्या होत्या. या वेळी याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष दक्षता घेतली होती. मतदार यादीतून नाव वगळण्यापूर्वी जिल्हा प्रशासनाने पूर्ण प्रकियेचे पालन केल्यामुळे शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघातून तक्रारी आल्या नसल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सोमवारी (ता. 29) सांगितले. 

शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघात सकाळी सात वाजता मतदान प्रकिया सुरू झाली. त्याआधी एक तास आधी मतदान केंद्रांवर मॉक पोल घेण्यात आला. या वेळी ज्या मतदान यंत्रामध्ये तांत्रिक समस्या निर्माण झाली अथवा मशिन बंद असल्याचे निदर्शनास आले त्या ठिकाणची यंत्रे तात्काळ बदलण्यात आली. शिरूर आणि मावळमध्ये चार हजारांपेक्षा अधिक मतदान केंद्रे आहेत. त्यापैकी फक्त 30 ते 35 यंत्रे बदलण्यात आली, असेही जिल्हाधिकारी राम यांनी सांगितले. 

पैसे वाटप करणाऱ्यास अटक 
मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये एका ठिकाणी एक व्यक्ती 48 हजार रुपयांचे वाटप करीत असल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. त्या व्यक्तीस अटक करण्यात आली असून पुढील कार्यवाही पोलिसांकडून करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. 

मतदान व्हायरल प्रकाराची चौकशी सुरू 
शिरूर येथे एका मतदान केंद्रावर मतदान करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियाद्वारे व्हायरल होत असल्याचे वृत्त प्रसारित होत आहे. मात्र त्याबाबत अद्याप अधिकृत माहिती प्राप्त झाली नाही. प्राथमिक स्तरावर चौकशी करण्यात येत असून, कोणत्या मतदान केंद्रावरील हा प्रकार आहे, याची माहिती घेण्यात येत आहे. याप्रकरणी अज्ञाताच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com