Lockdown : सध्या वाहतूक नसल्याने रस्त्याची अपूर्ण कामे पूर्ण करण्याची संधी

Lockdown : सध्या वाहतूक नसल्याने रस्त्याची अपूर्ण कामे पूर्ण करण्याची संधी

आंबेठाण - देशात लॉकडाउन सुरू होऊन जवळपास 34 दिवस उलटले आहेत. त्यापूर्वी सुरू असणारी जिल्ह्यातील प्रमुख रस्त्यांसह अन्य कामे अर्धवट थांबवावी लागली. आता पावसाळा तोंडावर आल्याने, तसेच एमआयडीसी क्षेत्र असूनही सध्या वाहतूक नसल्याने रस्त्याची अपूर्ण कामे सुरू केल्यास ती मार्गी लागतील. पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण झाली नाहीत, तर मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सरकारच्या अर्थसंकल्पातून जिल्ह्यातील औद्योगिक विभागातील रस्ते रुंदीकरण आणि नूतनीकरणासाठी हायब्रीड ऍन्युटी (टीएन 27) ही योजना आखली आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील खेडमधील तीन, मावळमधील दोन आणि पुरंदरमधील एक असे सहा रस्ते केले जात आहेत. या मार्गांवर औद्योगिक परिसर आणि नागरी वस्ती असल्याने काम सुरू असताना वाहतूक कोंडी होते. सध्या लॉकडाउन असल्याने हे काम करणे सोयीचे ठरणार आहे. 

चाकण येथे काम सुरू असणारा रस्ता आंबेठाण चौकात मुख्य पुणे- नाशिक रस्त्याला जोडला जात असल्याने येथे मोठी वाहतूक कोंडी होते. जर पावसाळ्यापूर्वी ही कामे मार्गी लागली नाही तर झालेल्या कामाचेही नुकसान होणार असून नव्याने पुन्हा तरतूद करावी लागणार आहे. सध्या अपूर्ण कामामुळे उडणाऱ्या धुळीमुळे स्थानिक नागरिक आणि प्रवासी त्रस्त झाले आहेत. 

आकडे बोलतात... 
निधी - 213 कोटी 
रस्ते - 6 
अंतर - 47 किमी 
कामगार - 350 

या सहा रस्त्यांचे काम अपूर्ण 
1. चाकण ते भांबोली फाटा (प्रजिमा 20.10 किमी) 
2. आसखेड फाटा ते करंजविहीरे मार्गे नवलाख उंबरे खिंड (प्रजिमा17- अ, 8.5 किमी) 
3. निघोजे ते मोई मार्गे चिंबळी फाटा (प्रजिमा 17- ब, 9 किमी) 
4. नवलाख उंबरे ते बधलवाडी (प्रजिमा 15.4 किमी) 
5. नवलाख उंबरे ते इंदोरी (प्रजिमा क्रमांक 103, 8.750 किमी) 
6. जेजुरी ते कोळविहीरे (प्रजिमा क्रमांक 134, 6.5 किमी) 

लॉकडाउन काळात काही साहित्य चोरीला गेले आहे. कामे सुरू झाली नाही तर नुकसान होणार असून कामगार बसून आहे. मशीनच्या भाड्यापोटी लाखो रुपये खर्च चालूच आहे. काम करण्यास परवानगी दिली तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य खबरदारी घेऊन काम करू. 
श्रीकांत वायकर, ठेकेदार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com