भामा आसखेडच्या कामांची वर्षअखेर पूर्तता - महापौर 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 मे 2018

पुणे - भामा आसखेड प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या कामांना वेग आला असून, ती येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होतील. ज्यामुळे पूर्व भागातील नागरिकांना पुरेसे पाणी मिळेल, असे महापौर मुक्ता टिळक यांनी मंगळवारी सांगितले. प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबत राज्य सरकारच्या पातळीवर तोडगा काढण्याच्या दृष्टीने निर्णय होईल, असेही त्या म्हणाल्या. 

पुणेकरांशी संवाद साधण्यासाठी महापालिकेने सुरू केलेल्या "महापौर आपल्या दारी' या उपक्रमांतर्गत नगर रस्ता परिसरात झालेल्या कार्यक्रमात महापौर टिळक बोलत होत्या. स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक, नगरसेवक कर्णे गुरुजी, संदीप जऱ्हाड, भैयासाहेब जाधव, नगरसेविका सुमन पठारे, सुनीता गलांडे, श्‍वेता गलांडे आदी या वेळी उपस्थित होते. 

महापौर टिळक म्हणाल्या, ""या भागातील नागरीकरण वाढत आहे. त्यामुळे पायाभूत सुविधांवर ताण आला असून, त्यातून नागरिकांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासत आहे. त्यामुळे भामा आसखेड प्रकल्पाचे काम मुदतीत पूर्ण केले जाईल. पूर्व भागातील नागरिकांचे अन्य प्रश्‍नही तातडीने सोडविण्यात येतील.'' 

Web Title: Completion of bhama askhed project year at the end