तक्रार मिळाली, काम सुरू आहे !

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 एप्रिल 2017

पीएमपीची संगणकीय तक्रार निवारण प्रणाली कार्यान्वित 

पुणे - ‘आपली तक्रार मिळाली, त्यावर वर्कशॉप विभागाकडून काम सुरू आहे’ किंवा ‘आपल्या तक्रारीचे निराकरण झाले आहे’, असा फोन किंवा ‘एसएमएम’ प्रवाशांना आला तर आश्‍चर्य वाटायला नको ! कारण पीएमपीची संगणकीय तक्रार निवारण प्रणाली आता कार्यान्वित झाली आहे अन्‌ तिच्यामुळे प्रवाशांना सुखद धक्केही बसू लागले आहेत. 

पीएमपीच्या बस म्हणजे तुटलेलेल्या खिडक्‍या, फाटलेले पत्रे असे चित्र प्रवाशांच्या डोळ्यांसमोर अनेकदा येते; परंतु या परिस्थितीत बदल करण्यासाठी प्रशासनाने नेटाने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी बसमध्ये दर्शनी भागात तक्रार नोंदविण्यासाठी दूरध्वनी क्रमांक असलेले फलक लावले आहेत. त्यावर ०२०-२४५०३३५५ किंवा ०२०-२४५४५४५४ अथवा एसएमएस, व्हॉट्‌सॲपसाठी ९८८१४९५५८९ या मोबाईल क्रमांकाची माहिती देण्यात आली आहे. प्रवास करताना प्रवासी बसमधील फाटकी आसने, थांब्यावर बस थांबली नाही, आदी कोणत्याही प्रकारची तक्रार या क्रमांकावर नोंदवली जाऊ शकते. प्रवाशांकडून तक्रार नोंदवून घेताना त्याचे नाव आणि मोबाईल क्रमांक प्रशासन नोंदवून घेते. त्या तक्रारीची नोंद संगणकीय तक्रार निवारण प्रणालीमध्ये केली जाते. ही नोंद पूर्ण झाल्यावर तक्रार ज्या विभागासंदर्भात असेल, त्या विभागाकडे ती तक्रार आपोआप जाते. तसेच प्रवाशाला ती तक्रार कोणत्या विभागाकडे पाठविण्यात आली आहे, याचा एसएमएस जातो. त्या अधिकाऱ्याने संबंधित तक्रारीचे निवारण किती दिवसांत होईल, याबाबत काही माहिती दिल्यास ती प्रवाशापर्यंत प्रत्यक्ष दूरध्वनीद्वारे किंवा एसएमएस, ई-मेलद्वारे पोचविली जाते. 

दररोज येतात ४०-४५ तक्रारी 
सध्या प्रशासनाकडे दररोज ४०-४५ तक्रारी येत असून, त्याचे निवारण करण्यासाठीही प्रक्रिया सुरू झाली आहे. तक्रारीचे निवारण झाल्यावर संबंधित प्रवाशाशी संपर्क साधूनही माहिती दिली जाते, असे अनुभव आता प्रवाशांना येऊ लागले आहेत. काही तक्रारींवर आठ दिवसांनीही संपर्क होतो; परंतु आपल्या तक्रारीवर प्रशासन काम करीत आहे, या अनुभवामुळे संबंधित प्रवासी सुखावू लागले आहेत.

Web Title: compliant receive work start