कृतियुक्त शिक्षणाची गरज - जगताप

Sakal-NIE
Sakal-NIE

पुणे - ‘विद्यार्थ्यांना कृतियुक्त शिक्षण देण्याची गरज आहे. शिक्षकांनी प्रात्यक्षिकासह विद्यार्थ्यांना शिक्षण दिल्यास ते अधिक उपयोगी पडेल. केवळ परीक्षेपुरते शिक्षण न देता त्यांना जिज्ञासा वाढविणारे शिक्षण आवश्‍यक आहे,’’ असे प्रतिपादन खडकी कॅंटोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जगताप यांनी केले.

सकाळ माध्यम समूहाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या सकाळ एनआयई व प्रादेशिक प्रशिक्षण केंद्र सर्दन कमांड खडकी कॅंटोन्मेंट बोर्ड यांच्या वतीने दोन दिवसीय शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेत सहभागी शिक्षकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या कार्यशाळेत पुणे, पिंपरी चिंचवडसह गुजरात, मध्यप्रदेश, बिहार, कर्नाटक या राज्यांतील शिक्षकांनी सहभाग घेतला. कार्यशाळेत गणित, विज्ञान, समाजशास्त्र, इतिहास यांसह विद्यार्थ्यांशी संवाद कसा साधावा, यावर ‘आयसर’चे अशोक रूपनेर (विज्ञानातील गमतीजमती), चैतन्य मुंगी (जीवशास्त्र अभ्यास), शांती पिसे (गणिताशी मैत्री), डॉ. नीरजा दशपुत्रे (रसायनशास्त्र), डॉ. रामकृष्ण भट (विज्ञानातील उत्सुकता), डॉ. आनंद कृष्णन (पक्षीतज्ज्ञ) आणि व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षक मनोज अंबिके यांनी शिक्षकांशी प्रात्यक्षिकासह संवाद साधला. प्रिन्सिपल डायरेक्‍टर पुणे डिफेन्स सिस्टिम सर्दन कंमाड एल. के. पेगु, प्रादेशिक प्रशिक्षण केंद्र सर्दन कमांड व्यवस्थापक स्वप्नाली देशमुख या वेळी उपस्थित होते. सकाळ एनआयईचे सहव्यवस्थापक विशाल सराफ, अक्षया केळसकर, सुमीत जाधव यांनी कार्यशाळेचे संयोजन केले.

सामाजिक बांधिलकीवर मार्गदर्शन 
शिक्षकांना हवेचा दाब, चुंबकीय परिणाम, ध्वनिलहरी, रासायनिक अभिक्रिया, भौमितिक रचना, गणिती सूत्रे व सोप्या पद्धती, इतिहास तसेच विद्यार्थ्याशी मैत्रीचे व आदराचे नाते कसे निर्माण करू शकतो त्यांच्या सामाजिक बांधिलकी कशी जोपासली पाहिजे, यावर कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com