
'कंबाईन पासिंग' साठी दोन्ही परीक्षा देणे बंधनकारक
पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यापीठ अधिकार मंडळाने शैक्षणिक वर्ष २०२१-२२ च्या उन्हाळी सत्राच्या सर्व विद्याशाखांच्या परीक्षांसाठी 'कंबाईन पासिंग' चा निर्णय घेतला आहे. या परीक्षेत लेखी तसेच तोंडी किंवा प्रात्यक्षिक अशा दोन्ही परीक्षांना विद्यार्थ्यांनी हजर असणे अनिवार्य आहे, असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने २८ जुलै २०२२ रोजी परिपत्रक काढत स्पष्ट केले आहे.
कोविडच्या पार्श्वूमीवर विशेष बाब म्हणून केवळ शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी एकत्रित गुणांकनाचा (कंबाईन पासिंग) निर्णय घेण्यात आला आहे. या वर्षातील परीक्षेचे शीर्ष म्हणजेच मौखिक, प्रात्यक्षिक, अंतर्गत आणि लेखी परीक्षा आदी वेगवेगळे न धरता एकत्रितरित्या ग्राह्य धरून त्याप्रमाणे निकाल घोषित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. मात्र लागू असलेल्या परिक्षेपैकी कोणत्याही परीक्षेस विद्यार्थी अनुपस्थित राहिल्यास अशा विद्यार्थ्यांना हा निर्णय लागू राहणार नसल्याचेही विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. याबाबतचे परिपत्रक क्रमांक २१० विद्यापीठे संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे.
दरम्यान याबाबत समाजमध्यामांवर काही चुकीची माहिती उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी त्यावर विश्वास न ठेवता विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर दिलेली माहिती वाचावी असेही आवाहन विद्यापीठाकडून करण्यात आले आहे.
Web Title: Compulsory To Give Both Exams For Combined Passing Savitribai Phule Pune University
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..