पुणे : वरिष्ठांच्या जाचास कंटाळून संगणक अभियंत्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

नामवंत आयटी कंपनीतील वरिष्ठांकडून काम करताना सातत्याने दिल्या जाणाऱ्या मानसिक त्रासास कंटाळून संगणक अभियंत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

पुणे : नामवंत आयटी कंपनीतील वरिष्ठांकडून काम करताना सातत्याने दिल्या जाणाऱ्या मानसिक त्रासास कंटाळून संगणक अभियंत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी नामवंत कंपनीच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

चेतन वसंतराव जायले (वय 26, रा. बालाजी हौसिंग सोसायटी, बालेवाडी फाटा) असे आत्महत्या केलेल्या संगणक अभियंत्याचे नाव आहे. याप्रकरणी कुंदन जायले (वय 29, रा. ठाकुर्ली ईस्ट, मुंबई) यांनी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन आणि चेतन याने मृत्युपुर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीवरुन रवि आठला व महेश खडके या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक डी.एस.शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे चेतन जायले यांची भाऊ आहेत.

चेतन मागील साडेचार वर्षांपासून हिंजवडीतील एका आयटी कंपनीमध्ये संगणक अभियंता म्हणून कार्यरत होता. मात्र त्यास संबंधित अधिकाऱ्यांकडून त्यास मोठ्या प्रमाणात मानसिक त्रास दिला जात होता. या त्रासाला कंटाळून चेतनने राहत्या घरी बुधवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, चेतनने त्यास वरिष्ठांकडून कशा पद्धतीने मानसिक त्रास दिला जात होता, याबाबत संबंधीत व्यक्तींच्या नावांचा उल्लेख मृत्युपुर्वी लिहीलेल्या चिठ्ठीमध्ये केला आहे. 

Web Title: computer engineer commits suicide at pune