पिंपरी: थोबाडीत मारल्याचा जाब विचारल्याने अभियंत्याचा खून

संदीप घिसे 
शनिवार, 16 मार्च 2019

मंजीत प्रसाद (रा. काळेवाडी) असे खून झालेल्या  तरुणाचे नाव आहे. मोहन संभाजी देवकते (वय २५, रा. चंदननगर, पुणे) यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी पाच अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत मंजीत हे विमाननगर येथील डब्ल्यू.एन.एस. या कंपनीत संगणक अभियंता होते.

पिंपरी, (पुणे) थोबाडीत मारल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून संगणक अभियंता तरुणावर धारदार शस्त्राने वार करत जिवे मारण्याची घटना डिलक्स चौक, पिंपरी येथे गुरुवारी रात्री घडली.

मंजीत प्रसाद (रा. काळेवाडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. मोहन संभाजी देवकते (वय २५, रा. चंदननगर, पुणे) यांनी याबाबत पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी पाच अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत मंजीत हे विमाननगर येथील डब्ल्यू.एन.एस. या कंपनीत संगणक अभियंता होते. तर फिर्यादी देवकाते हे आपल्या टेम्पो ट्रॅव्हलर मधून आयटीतील अधिकाऱ्यांना सोडविण्यासाठी चालले होते. रात्री बारा वाजताच्या सुमारास ते पिंपरीतील डिलक्स चौक परिसरात आले. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या काही जणांनी टेम्पो ट्रॅव्हलरचा पुढे आडवी दुचाकी घालत टेम्पो चालकाला गाडी उभी करण्यास भाग पाडले.

त्यांनी टेम्पो चालकाला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यामुळे टेम्पोत बसलेल्या मंजीत यांनी 'क्यों क्या हुआ' अशी विचारणा त्या दुचाकीवरील तरुणांना केली. त्यापैकी एकजणाने खिडकीतून हात घालत मंजित यांच्या थोबाडीत मारली. थोबाडीत का मारली? असा विचारण्यासाठी मंजीत खाली उतरले. त्यावेळी पाच जणांनी लाथा बुक्क्यांनी त्यास मारहाण केली. त्यानंतर मंजित यांच्यावर धारदार शस्राने वार केले. गंभीर जखमी झालेल्या मंजित यांच्यावर थेरगाव येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू असताना शुक्रवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले आहे.

Web Title: computer engineer murder in Pimpri