मारहाण करून संगणक अभियंत्यास लुटले 

संदीप घिसे 
बुधवार, 20 जून 2018

पिंपरी (पुणे) : रात्रीच्यावेळी घरी चाललेल्या एका संगणक अभियंता तरुणास लोखंडी रॉडने मारहाण करून लुटण्यात आले. ही घटना बालेवाडी येथे घडली. पलाष विवेक चिंचोळीकर (वय २५, रा. ब्लू रिज टॉवर, हिंजवडी) असे मारहाणीत जखमी झालेल्या संगणक अभियंत्यांचे नाव आहे. 

मंगळवारी त्यांनी याबाबच हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दुचाकीवरील तीन चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

सहाय्यक पोलीस निरीक्षक टोनपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (ता. १६) मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास चिंचोळीकर हे घरी चालले होते. ते बालेवाडी स्टेडियमच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आले असता, दुचाकीवरील तीन चोरटे आले. त्यांनी चिंचोळीकर यांना सुरुवातीला हाताने आणि नंतर लोखंडी रॉडने मारहाण केली. त्यांच्या खिशातील मोबाइल तसेच पायातील स्पोर्ट शूज काढून घेतले. त्यानंतर त्यांच्या जवळील एटीएम कार्डही काढून घेतले. मारण्याची भीती दाखवत एटीएम कार्डचा पासवर्ड घेऊन त्याद्वारे नऊ हजार २०० रुपये काढून घेतले. सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश धामणे याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Web Title: computer engineer robbed