Abhijit
Abhijit

संगणक अभियंत्याची चिंचवडमध्ये आत्महत्या

पिंपरी - हिंजवडीतील आयटी कंपनीत संगणक अभियंता असलेल्या तरुणाने आत्महत्या केली. ही घटना चिंचवड येथे शुक्रवारी (ता.१०) सकाळी घडली.

अभिजित रामदास मुळ्ये (वय ३८, रा. गिरिराज हाउसिंग सोसायटी, बिजलीनगर, चिंचवड. मूळ गाव कळंब, उस्मानाबाद) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजित हे संगणक अभियंता असून, हिंजवडीतील एका नामांकित कंपनीमध्ये कामाला आहेत. शुक्रवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास त्यांनी राहत्या घरात छताच्या पंख्याला ओढणीच्या साह्याने गळफास लावून घेतला. याबाबत माहिती मिळताच, चिंचवड पोलिस घटनास्थळी पोचले. त्यांनी अभिजित यांना वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

अभिजित यांना चित्रपट क्षेत्राची प्रचंड आवड होती. त्यांनी आठ ते दहा शॉर्ट फिल्म तयार केल्या होत्या. तसेच स्त्रीभ्रूणहत्येवर आधारित ‘स्त्री-सुप्त’ या नाटकात त्यांनी काम केले होते. या नाटकाचे ८०हून अधिक प्रयोग झाले आहेत. मोरया गोसावी यांच्या जीवनावर आधारित मालिकेमधूनही त्यांनी काम केले होते. नोकरीमुळे अनेक मोठ्या चित्रपटांतील भूमिका नाकाराव्या लागतात, याची खंत त्यांना वाटत होती. नोकरी सोडून चित्रपट क्षेत्रात जावे, अशी त्यांची इच्छाही होती. आपल्या सांगवी येथील मित्राशी बोलताना त्यांनी ती व्यक्‍त केली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com