संगणक यंत्रणा गतिमान करण्यासाठी 3.18 कोटी

Computer
Computer

पुणे - महापालिकेत नागरिकांना सुविधा देण्यासह बरेच कामकाज ऑनलाइन होते. परंतु, वेळोवेळी संगणक यंत्रणेत बिघाड होत असल्याने काम संथ गतीने होते. यामुळे पुढील तीन वर्षांसाठी महापालिकेची सर्व संगणक यंत्रणा गतिमान करणे आणि देखभालीसाठी 3 कोटी 18 लाख रुपयांच्या खर्चाला स्थायी समितीने सोमवारी मान्यता दिली.

महापालिकेत "ई-गव्हर्नन्स' प्रकल्प राबविला जात आहे. त्यामध्ये विविध विभागांतील कामकाज ऑनलाइन केले जात आहे. हे काम करताना संगणकीय हार्डवेअर व त्यावरील कामाचा ताण कमी होण्यासाठी सुसंगत "इन्फ्रास्ट्रक्‍चर अँड फॅसिलिटी सर्व्हिस'ची गरज आहे. त्याअंतर्गत महापालिकेतील सर्व्हर, संगणक, प्रिंटर यांची देखभाल करणे व त्यासाठी मनुष्यबळ पुरविणे ही कामे होणार आहेत. नेटवर्क व इंटरनेटच्या कामातील नियंत्रणासाठी सर्व्हर, ऍप्लिकेशन, डेटाबेस सर्व्हर मॅनेजमेंट, संगणकातील सॉफ्टवेअरचे परवाने अद्ययावत करणे आदी कामेही होतील.

महापालिकेत 11 गावे नव्याने समाविष्ट झाली आहेत. या ग्रामपंचायतींच्या संगणक व हार्डवेअरची देखभाल करावी लागणार आहे. महापालिका राष्ट्रीय डिजिटल साक्षरता मोहिमेअंतर्गत गरीब व गरजू विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत आहे. त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्रणेची दुरुस्ती आवश्‍यक आहे. महापालिकेच्या ऑनलाइन कामाचा व्याप वाढत असल्याने यंत्रणा अद्ययावत ठेवणे आवश्‍यक आहे. या सर्व कामांसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. यात पोलस्टार कन्सलटिंग कंपनीने सर्वांत कमी दराने 3 कोटी 18 लाख रुपयांची निविदा भरली होती. त्यास मंजुरी देण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com