Video : कॉम्रेड मॅरेथॉन धावपटूची 'टेरेस रन', सोसायटीच्या टेरेस वर सराव

P-Venugopal
P-Venugopal

पिंपरी - देश-विदेशातील मॅरेथॉन अनवाणी पायाने धावून पूर्ण करण्याचा छंद असलेल्या पिंपळे सौदागर येथील कॉम्रेड अल्ट्रा मॅरेथॉनपटूने स्वतः च्या दैनंदिन व्यायामात खंड पडू नये यासाठी 'टेरेस रन' सुरु केली आहे. 

पी. वेणुगोपाल असे त्या धावपटूचे नाव आहे. टाटा मोटर्स कंपनीत उच्च पदावर वेणुगोपाल हे कार्यरत असून त्यांना धावण्याची आवड आहे. शहरातील हौशी धावपटूंनी एकत्र येऊन 'पीसीएमसी रनर्स' या गटाची स्थापना केली असून त्याचे सदस्य म्हणून ते कार्यरत आहेत. सध्याच्या लॉकडाऊन मुळे या गटातील अनेक सदस्यांना दैनंदिन व्यायाम आणि सरावापासून वंचित रहावे लागत आहे. मात्र, वेणुगोपाल यांनी त्यावर तोडगा काढत स्वत:च्या घराच्या मोकळ्या टेरेस आणि कॉरिडॉर मध्ये धावण्याचा सराव चालूच ठेवला आहे. दररोज सकाळी दोन तास त्यांची 'टेरेस रन' चालू आहे.

वेणुगोपाल म्हणाले, "२५ मार्च पासून रोज माझ्या अपार्टमेंट मधील पाचव्या मजल्यावरील टेरेस किंवा मोकळ्या कॉरिडॉर मध्ये धावण्याचा सराव करत आहे. रोज साधारणत: तासभर धावतो. परंतु, आज मी जवळपास १ तास ३७ मिनिटे धावलो. माझी आतापर्यंत १ तास ४७ मिनिटे इतकी सर्वाधिक धाव ठरली आहे. येत्या दिवसांत २ तास 'टेरेस रन' करणार आहे. या टेरेस रन मुळे मला गती, दमखम,श्वासावर नियंत्रण ठेवण्यासाठी फायदा होत आहे."

वेणुगोपाल यांनी देशभरातील अनेक अर्ध आणि पूर्ण मॅरेथॉन अनवाणी पायाने धावून पूर्ण केल्या आहेत. दक्षिण आफ्रिका येथील कॉम्रेड अल्ट्रा मॅरेथॉन देखील त्यांनी अनवाणी धावून पूर्ण केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com