शेतकऱ्यांना अडचणी येऊ नयेत याची खबरदारी घ्या - विश्वास देवकाते

meeting
meeting

शिर्सुफळ (पुणे) : शेतकऱ्यांना खरीप हंगामात कोणत्याही प्रकारे अडचण येणार नाही याची खबरदारी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी घ्यावी. असे निर्देश पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी दिले. 

बारामती तालुका खरीप हंगाम 2017 चा आढावा व 2018 चे नियोजन व चारा पाणी टंचाई आढावा बैठक बारामती येथील वसंतराव पवार नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी देवकाते बोलत होते. यावेळी कृषी व पशुसंर्वधन सभापती सुजाता पवार, जिल्हा कृषी अधिकारी सुनिल खैरनार, उपविभागीय कृषी अधिकारी बालाजी ताटे, सभापती संजय भोसले, उपसभापती शारदा खराडे, जिल्हा परिषद सदस्य भरत खैरे, रोहिणी तावरे, मिनाक्षी तावरे, पंचायत समिती सदस्य प्रदिप धापटे, राहुल भापकर, राहुल झारगड, अबोली भोसले, गटविकास अधिकारी प्रमोद काळे, निवासी तहसिलदार आर.सी पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, तालुक्यातील गावचे सरपंच, ग्रामसेवक, तलाठी व अन्य मान्यवर उपस्थित होते.           

यावेळी बोलताना देवकाते यांनी प्रथम शेतकरी कमी व अधिकारी जास्त उपस्थित याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली व पुढे म्हणाले, कृषी विभागाने प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत योजनांची माहिती पोहचेल यादृष्टीने प्रयत्न करण्यात यावे. बारामती तालुक्यामध्ये शासन तसेच विविध सामाजिक संस्था यांच्या माध्यमातुन मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे झाली आहेत. यामुळे गेल्या वर्षी या महिन्यात तालुक्यात 29 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात होता. यंदा ती संख्या कमी होऊन पाच ते सहा वर आली आहे.तसेच यंदा झालेल्या कामांमुळे पुढिल वर्षी यामध्ये आणखी घट होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सभापती सुजाता पवार यांनी शेतकऱ्यांना बियाणे किंवा खते खरेदी करताना शासकिय परवानाधारक दुकांनामधुन खरेदी करावीत व त्याची पावती घ्यावी जेणे करुन जर बियाणे उगवले नाही किंवा उत्पादन कमी झाले तर संबंधित कंपनीला याबाबत खुलासा मागवता येईल. याबरोबरच कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांनी बियाणे खते कमी पडु दिली जाणार नाहीत. याची दक्षता घेतली जाणार असल्याचे सांगितले.
       यावेळी टंचाईचा आढावा पाणी पुरवठा विभागाचे उपभिअभियंता अरविंद कोकरे व कृषिविभागाचा माहिती तालुकाधिकारी संतोषकुमार बरकडे यांनी दिली. प्रास्ताविक प्रमोद काळे, सुत्रसंचालन सुनिल जगताप, संजय जगताप व आभार सभापती संजय भोसले यांनी मानले.

सकाळच्या जलसंधारण कामाची दखल 
या बैठकीमध्ये बोलताना जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी बारामती तालुक्यामध्ये सुरु असलेल्या जलसंधारण चळवळीचे कौतुक केले. यामध्ये सकाळ रिलीफ फंड, अँग्रीकल्चरल डेव्हल्मेंट ट्रस्ट, शरयू फाऊंडेशन, इन्व्हाँयर्मेंटल फोरमच्या माध्यमातुन तसेच पानी फाऊंडेशनच्या माध्यमातुन श्रमदानातुन मोठ्या प्रमाणावर जलसंधारण कामे झाली आहेत.यामुळे तालुका टँकरमुक्त होण्यास मदत होणार आहे.

222 कोटी थकविल्याने सरकारवर टिका..
विश्वास देवकाते यांनी आपल्या भाषणात सुजाता पवार यांच्या कृषी विभागाला निधी वाढवुन देण्याचा मागणीचा धागा पकडत सरकारवर टिका केली. सरकार पुणे जिल्ह्यावर जाणुनबुजुन अन्याय करत आहे. सध्या सरकारकडे 222 कोटी रुपये मुद्रांक शुल्क येणे आहे. यामुळे विकासकामांवर परिणाम झाला आहे. याकडे सरकार जाणुनबुजुन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com